शेतकऱ्यांनी काढला दुष्काळी आक्रोश मोर्चा

बीड : बीड(Beed) जिल्ह्यामधील अंबाजोगाई (Ambajogai)शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी दुष्काळी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शेतकरी बचाव कृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने काढण्यात आला.

ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली आहे. अंबाजोगाई तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न, खरीप पिकाचा प्रश्न पिकविम्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुका दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याना दुष्काळी अनुदानापोटी प्रति हेक्टरी १ लाख रुपये खात्यावर तात्काळ द्यावेत यासह अन्य मागण्यासाठी 40 गावच्या सरपंचांनी शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात सरपंचांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Social Media