केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या ‘गडकरी’चा टिझर प्रदर्शित

मुंबई : ए. एम. सिनेमा (A. M. Films)आणि अभिजीत मजुमदार (Abhijeet Majumdar)प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ (Gadkari)हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून अक्षय अनंत देशमुख निर्मित, अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचे आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari)या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्यावेळी नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari)त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. टीझरची सुरुवातच ”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या ओळीने होतेय. त्यामुळे हा टिझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

Social Media