मुंबई : महाराष्ट्र(Maharashtra) शासनाच्या क्रीडा विभागा मार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(Shiv Chhatrapati State Sports Awards) ( दिव्यांग खेळाडूं) तसेच जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने नुकत्याच २९ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली, २०२३ ची नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. ०८ जानेवारी ते २२ जानेवारी, २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळांडू तसेच साहसी खेळाडू यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळांडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. २२ जानेवारी रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.