प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘फायटर’चा ट्रेलर

अभिनेत्री दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan)  यांचा बहुप्रतिक्षित फायटर(Fighter) हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

फायटर(Fighter) चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन हृतिक रोशनने ट्रेलर रिलीजची घोषणा केली आहे. फायटरचा ट्रेलर 15 जानेवारीला दुपारी 12 वाजता रिलीज होणार आहे. चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर IMAX 3D मध्ये पाहता येणार आहे.

फायटर(Fighter) हा चित्रपट  भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांवर आधारित आहे, ज्यामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर(Anil Kapoor) हे या चित्रपटात कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या (Captain Rakesh Jaising)दमदार भूमिकेत दिसणार आहे.

Social Media