बिग बॉस 17 च्या विजेत्याला मिळणार ट्रॉफी, रोख रक्कमसह ‘हे’ धमाकेदार गिफ्ट

‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17)हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला काय बक्षीस मिळणार? What will be the prize for the winner of ‘Bigg Boss 17’?

▪️ ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला ट्रॉफी, आलिशान कार आणि 50 लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. 28 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

 ‘या’ स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस :

▪️ अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, औरा, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, मनारा चोप्रा, अनुराग डोभाल, ईशा मालवीय, समर्थ जुरेल, अभिषेक कुमार, रिंकू धवन आणि अरुण माशेट्टी या स्पर्धकांमध्ये चुरस रंगणार आहे.

Social Media