बिग बॉसला मिळाले यंदाचे टॉप 5 फायनलिस्ट! कधी आणि कुठे पाहता येणार

बिग बॉस 17(Bigg Boss 17) या रिअॅलिटी शोची सर्वांना उत्सुकता आहे. या रिअॅलिटी शोची वाटचाल आता ग्रँड फिनालेकडे होत आहे. अशातच बिग बॉस 17 ला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. नुकतंच शोमधून अंकीता लोखंडेचा पती विकी घराबाहेर गेला. त्यामुळे आता बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला आहे.

 हे ठरले बिग बॉस 17 चे टॉप 5 (Bigg Boss 17 Top 5):

या शोमध्ये अभिषेक कुमार(Abhishek Kumar), मन्नारा चोप्रा(Mannara Chopra), मुनावर फारुकी(Munawar Farooqui), अरुण मशेट्टे(Arun Mashete) आणि अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) हे टॉप 5 स्पर्धक फिनालेमध्ये दाखल झाले आहेत.

कलर्स चॅनलवर रविवारी 28 जानेवारी रोजी BB 17 ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. हा ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 च्या दरम्यान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. याशिवाय प्रेक्षकांना हा फिनाले JioCinema वर पाहता येईल.

Social Media