बजेट सेट करा :
क्रेडिट कार्डने(Credit cards) खरेदी करताना आपण किती पैसे खर्च केले हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे खरेदीला जाण्यापूर्वी बजेट ठरवणे नेहमीच महत्त्वाचे असते. तुम्ही अगोदरच बजेट सेट कराल तर ते तुम्हाला प्रत्यक्षात तेवढेच खर्च करण्यास मदत करते.
योग्य कार्ड निवडा :
आजकाल क्रेडिट कार्डमध्ये (Credit cards)अनेक प्रकारची कार्डे उपलब्ध आहेत. परंतु आपण कोणतेही कार्ड घेतो ज्यामुळे आपल्याला क्रेडिट कार्डचे (Credit cards)पूर्ण बेनिफिट मिळत नाहीत. म्हणून जेव्हाही तुम्ही क्रेडिट कार्ड घ्याल तेव्हा तुमच्या शॉपिंग हॅबिट्स लक्षात घेऊन ते निवडा.
वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करता त्यावेळी तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी. साधारणपणे, क्रेडिट कार्ड पेमेंट करण्यासाठी, कार्ड आणि पिन किंवा साइन आवश्यक आहे. त्यामुळे कीपॅडवर पिन टाकताना तुम्ही थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे.
पावती तपासा :
क्रेडिट कार्ड(Credit cards) पेमेंट करताना काही दुकाने जास्त पैसे घेतात आणि आपण त्याकडे लक्षही देत नाही. म्हणून क्रेडिट कार्ड पेमेंट केल्यानंतर नेहमी तुमच्या पावत्या तपासा.