नागपूर : गुंठेवारीचा दर 56 रुपयावरून 168 रुपये करणारा काळा जी आर रद्द करा, गुंठेवारी भूखंडावरील वाढवलेले दर त्वरित रद्द करा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपूर सुधार प्रन्यासच्या झोन कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नागपुरातील अंबाझरी रोडवरील नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयासमोर भाजपा शहर अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळेला शासनाने काढलेल्या काळ्या जी. आर. चा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आला.
नियमितीकरण्यासाठी लादण्यात आलेला विकास शुल्क वापस न घेतल्यास एक लाख लोकांचं मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 4 ठिकाणी भाजपा आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
A dharna was organized by the BHARATIYA Janata Party in front of the zoning office of Nagpur Reforms Trust demanding cancellation of black GR from Rs 56 to Rs 168, immediate cancellation of increased rates on Gunkhari plot.
दि 25 -नोन्बेंबर 2021