गतिमंद ‘अमृतपुत्रांनी’ आपल्या नवदृष्टीतून नवदुर्गेचे साकारलं चित्र

मुंबई : यंदा नवरात्री निमित्ताने मतिमंद,गतिमंद अश्या ‘अमृतपुत्रांनी’ आपल्या नवदृष्टीतून नवदुर्गेचे कलेच्या माधम्यातून संदेशपर छानसं पुष्प आपल्या पुढ्यात ठेवलं आहे.
यात दृष्टीहीन मुलं ही आहेत त्यांनी त्यांच्या आत्मदृष्टीतून कलेच्या सहाय्याने एक वेगळचं महत्वपर असं चित्र साकारलं आहे.

निसर्ग,शिक्षण, महिला सबलीकरण,कला असे नानाविध महत्वाचे विषय त्यांनी नऊ रंगातून नवं दुर्गा साकारून लक्षवेधक मांडले आहेत, त्यांच हे काम खरतर वाखाणण्याजोगं आहे. आपल्याला अवतीभवतीच्या समस्या दिसतात पण त्यावर भाष्य करणं,कृती करणं आपल्या हातून सहसा घडत नाही पण ही मुलं आपल्या पद्धतीने सहज कळेल असं मांडत आहेत.त्यांचं असं स्वावलंबी होणं ही जमेची बाब आहे.

त्यांच्या ह्या दृष्टीला जाणून खरतर नवदृष्टी देण्याचं काम ही संकल्पना सुमित पाटील यांची आहे. त्यांनी ‘श्रीरंग ‘ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ह्या मुलांना प्रोत्साहित करून हे सारं आपल्या पुढ्यात ऊभं केलं आहे,त्यांना यात तनवी पालव यांचीही साथ लाभली आहे. श्रीरंग ट्रस्ट मधून सुमित पाटील असे बरेच समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. ‘ नवदुर्गा… नवदृष्टी ‘ या उपक्रमातील छायाचित्रण आरती कडवाडकर तर शब्दरचना नितीन मोकल यांची आहे,सजावट उत्तम सुतार आणि अजय गावडे यांनी केलीय, वेशभूषा सायली पाटणकर, रंगभूषा रचना पाटील,काजल गुप्ता यांची आहे

यासाठी विशेष सहकार्य लाभलेली मंडळी खालीलप्रमाणे
– प्रवीण बर्वेकर,श्वेता पडवळ, सिद्धेश परब,सौरभ नाईक,नरेपार्क मतिमंद मुलांची शाळा परेल.

A picture of Navadurga from the new vision. On the occasion of Navratri this year, the ‘Amritputras’ who are mentally retarded, dynamic, have placed a nice flower in front of them through the art of Navdurga through their innovations. These are visually impaired children who have painted an important picture of a difference with the help of art through their self-vision.

Social Media