सांगली : इस्लामपूर(Islampur) येथील कुमार पाटील यांनी फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. एक वर्षाच्या मेहनती नंतर ही चारचाकी तयार झाली. एक लिटर पेट्रोलमध्ये एक एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम ही चारचाकीगाडी करत आहे. अल्प वेळेत आणि कमी खर्चात चारचाकी काम करत असल्याने शेतकऱ्यांना ती वरदान ठरणार आहे.
जोडली, कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने आण करणे यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गर्डवर तशी रचना केली आहे. गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर केला. गिअर टाकून गाडी पुढे आणि पाठीमागे सहज येते.
इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला आहे. एक वर्षाची मेहनत आणि सुमारे ६० हजार रुपये खर्चून ही गाडी बनली आहे.यापूर्वी देवराष्ट्र आणि सांगलीतील दोन अवलियानी भंगार साहित्या पासून चार चाकी बनवली होती, आता तिसरी गाडी इस्लामपूर मध्ये तिसऱ्या कारागिराने बनवली आहे.
Kumar Patil from Islampur has built a four wheeler using experience and skills in the fabrication business. The four wheeler was built after a year of hard work. The four-wheeler is carrying out coal harvesting in an acre area through one litre of petrol. It is going to be a boon to farmers as it works four wheelers in a short time and at a lower cost.