Jhund : ‘आया ये झुंड है…’; झुंडचे  हिट गाणे रिलीज

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या झुंड चित्रपटातील आया ये झुंड है हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. गाण्यात अमिताभसोबत काही लहान मुलंही दिसत आहेत. या गाण्यात अभिनेता आकाश ठोसरही दिसत आहे. या चित्रपटात आकाश ठोसरची महत्त्वाची भूमिका असणार आहे. सैराट चित्रपटानंतर आकाश  खूप लोकप्रिय झाला आहे.हे गाणे अतुल गोगावले यांनी गायले आहे. हे गाणे अजय गोगावले आणि अतुल यांनी लिहिले असून या गाण्याचे संगीतही त्यांनीच दिले आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे.

गाण्यात अमिताभसोबत काही लहान मुलंही दिसत आहेत. या गाण्यात अभिनेता आकाश ठोसरही दिसत आहे. या चित्रपटात आकाश महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सैराट चित्रपटाने आकाशला खूप लोकप्रिय केले.

फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित चित्रपट

झुंड या चित्रपटाची कथा फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. जवळच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःची फुटबॉल टीम तयार केली. याच कथेवर  ‘झुंड’ हा चित्रपट आधारित  आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 18 जून रोजी रिलीज होणार होता पण नंतर रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

The song Aaya Yeh Jhund Hai from the movie Jhund starring Bollywood megastar Amitabh Bachchan in the lead role was recently released. The song also features a few little kids along with Amitabh. The song also features actor Akash Thosar.


‘लाल सिंग चड्ढा’, ‘KGF2’ आणि ‘रनवे 34’ आणि ‘हिरोपंती 2’ सारखे अनेक बिग बजेट चित्रपट एप्रिलमध्ये होणार प्रदर्शित

Single : प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची हास्यधमाल जोडी दिसणार ‘सिंगल’ चित्रपटात !

Social Media