मुंबई : ई-पास बाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र देशाला डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेत असल्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकारांच्या अन्य प्रश्नांवर मात्र त्यांनी संयमी आणि खास ठेवणीतील उत्तरे देत प्रश्न टोलवले.
‘अरे कशाचा दाऊद दाऊद करत बसला. काहीतरी, कोणीतरी टीव्हीला दाखवतात. काल दाखवले दाऊद पाकिस्तानमध्ये, आज दाखवले दाऊद आमच्याकडे नाही.! तो एकादृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. कारण, वातावरण खराब करण्याचे काम त्या टोळीने केले आहे. केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि त्यावर निर्णय घेतील. ते सक्षम आहेत, आम्ही त्यात वक्तव्य करणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या विषयावरही बोलण्यास नकार दिला. त्या विषयावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा? असा प्रतिप्रश्न विचारत अजित पवार निघून गेले.
आज पुण्यात पहिल्या जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. यावेळी पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. केल्या काही दिवसांपासून जम्बो हॉस्पिटल बाबत आरोप प्रत्यारोप होत असताना आज हे उद्घाटन झाले.