अदार पूनावाला यांनी लस बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला विकले संपूर्ण शेअर्स!

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी पॅनेसिया बायोटेक(Panacea Biotec) मधील आपला संपूर्ण ५.१५ टक्के हिस्सा ११८ कोटी रूपयांना विकला आहे. पुनावाला यांनी खुल्या बाजारात (open market)केल्या गेलेल्या कराराअंतर्गत हे शेअर्स विकले आहेत.

कोणी खरेदी केले हे शअर्स (Who bought shares)

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) कराराच्या आकडेवारीनुसार, पूनावाला यांनी पॅनेसियाच्या त्यांच्या वैयक्तिक खात्यातील 31,57,034 शेअर्स 373.85 रूपये प्रति शेअर्स किंमतीला विकले ज्य़ामुळे त्यांना एकूण 118.02 कोटी रुपये प्राप्त झाले. हे शेयर्स त्याच किंमतीत एका वेगळ्या कराराने पूनावाला यांच्याच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने खरेदी केले.

पॅनेसियाच्या मार्च २०२१ च्या शेअरहोल्डिंगच्या आकडेवारीनुसार, पूनावाला आणि एसआयआय कंपनी अनुक्रमे ५,१५ टक्के आणि ४.९८ टक्के भागीदारीसह सार्वजनिक भागधारक होते. सोमवारी पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec)चे शेअर्स ३८४.९ रूपयांवर बंद झाले. पॅनेसिया बायोटेक अनेक प्रकारची औषधे आणि लसीचे (vaccine) उत्पादन करते. त्याची स्थापना १९८४ मध्ये झाली होती आणि १९९५ मध्ये पॅनेसिया बायोटेक लिमिटेड म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते.

सीरम इन्स्टिट्यूट भारतात ऑक्सफर्ड/एस्ट्राजेनेकाची कोव्हिड-१९ वॅक्सीन ‘कोव्हिशील्ड’ (Covishield) चे उत्पादन करीत आहे. लंडनला जाण्यापूर्वी पूनावाला यांनी असे म्हटले होते की, अनेक नामांकित लोक त्यांना धमक्या देत आहेत. त्यांनी सांगितले की, या दबावामुळेच ते त्यांची पत्नी आणि मुलांसह लंडनला गेले आहेत. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनुसार संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.

Serum Institute of India (SII) CEO Adar Poonawala sold his entire 5.15 per cent stake in Panacea Biotec for Rs 118 crore. Poonawala sold these shares under an open market deal.

Social Media