मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ जणांना
मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालायाने हा निर्णय दिला आहे. सध्या हे सर्व एसटी कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात गुणरत्न सदावर्ते हे मुख्य आरोपी तर एसटी कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. न्यायालयाने सदावर्तेंना ५० हजारांच्या जातमुचक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमी रकेमवर जामीन मंजूर केला आहे. तर इतर ११५ आंदोलकांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयाने हा जामीन मंजूर केला असला तरी याची डिटेल ऑर्डर येण्यासाठी संध्याकाळ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ती जेल प्रशासनाकडे जाईल. त्यामुळे उद्या या सर्व आरोपींची सुटका होऊ शकते. मात्र, उद्या जर त्यांची सुटका झाली नाही तर या सर्वांचा मुक्काम कोठडीतच असेल आणि सोमवारपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यानंतर मराठा आरक्षणासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोल्हापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तत्पुर्वी मुंबई सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह इतर ११५ एसटी कर्मचाऱ्यांना आता जामीन मंजूर झाला आहे.
आबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली; मान्यवरांसह साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग