आदित्य रॉय कपूरच्या ‘ओम’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा ओम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये आदित्यच्या फिटनेसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 57 सेकंदाच्या या टीझरमधील अॅक्शन सीक्वेन्स नेटिझन्समध्ये खूप लोकप्रिय झाले आहे.

आदित्यने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.  आदित्यने  कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘युद्ध जिंकण्यासाठी त्याला अनेक वेळा लढावे लागते. ‘ओम’ हा चित्रपट १ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शक कपिल वर्मा हे आहेत. अहमद खान, शेरा खान आणि झी स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पहिल्या टीझरनंतर नेटकऱ्यांना चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा आहे.

आदित्य रॉय कपूरचा व्हिलन 2 हा चित्रपटही लवकरच येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा लुडो हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

Social Media