मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा ॲड. चारुलता टोकस यांच्या अध्यक्षेखाली कौटुंबिक हिंसाचार व प्रतिबंधक कायदे या विषयावर “निश्चय केला आता बनणार मी अपराजिता” या नव्या उपक्रमाअंतर्गत वेबिनारव्दारे प्रशिक्षण शिबीराचा स्वातंत्र्य दिनाचा पुर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माजी खासदार श्रीमती सुश्मिता देव यांच्या नेतृत्वात तथा माननीय नामदार श्री. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मंत्री महसूल यांच्या मार्गदर्शनात, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या विधी विभागामार्फत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडावूनमुळे कौटूंबीक जिवनात ढासळत असलेली आर्थिक परिस्थिती, उद्भवनारे रोजगाराचे संकट, महिलांवर वाढते घरगुती अत्याचार, महिलांचे आरोग्य, महिलांना संरक्षण देणारे कायदे, अशा विविध विषयांतील तज्ञ मार्गदर्शकांचे याविषयी माहिती देण्या-या प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यांत आला.
उद्घाटकीय शिबीरामध्ये महिलांवर वाढत्या घरगुती हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर कौटुंबिक हिंसाचार व प्रतिबंधक कायदे या विषयावर वेबिनारव्दारे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राला अ.भा.म.काँग्रेसच्या सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी श्रीमती आकांक्षा ओला, ॲड. सुझीबेन शहा, प्रभारी अ.भा.म.का. विधी विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या चर्चासत्राला प्रमुख वक्त्या म्हणुन ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी “कौटुंबिक हिंसाचार व प्रतिबंध कायदा २००५” याबाबत विस्तृत माहिती ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर यांनी सर्व उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ॲड. चारुलता टोकस यांनी स्त्री ही शक्ती, संयम व सहनशिलतेचे प्रतिक असून भारतीय कुटूंबव्यवस्थेमधे एक आधारस्तंभ आहे. मात्र महिलांना त्यांच्या अधिकाराची जाणिव नसल्यामुळे त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडतात. तुमचा अधिकार आमचा लढा हेच महिला काँग्रेसचे ब्रिद वाक्य असल्याचेही त्या म्हणाल्या. देशात कौटुंबीक हिंसाचारामध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतिने हा एक नविन उपक्रम सुरु करण्यांत आला असल्याचे त्यांनी सांगीतले.
श्रीमती आकांशा ओला सचिव, अ.भा.म.काँ. कमिटी तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस यांनीही महिला काँग्रेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी महिलांचे अधिकार व कायदयांची संपुर्ण माहिती घेवून अन्यायग्रस्त महिलांना मदत करावी तसेच त्यांच्या माहितीतील व परिसरातील महिलांना त्यांच्या अधिकाराबाबत व कायदयांबाबत जागृत करावे, असे सांगीतले.
कार्यक्रमाच्या प्रमुख ॲड. सुझीबेन शहा, प्रभारी अ.भा.म.कॉ. विधि विभाग यांनी सांगीतले की, आपण सर्व राजकीय क्षेत्रात काम करणा-या महिला असून सर्वसामान्य महिलांना आपल्याकडून मदतिची अपेक्षा असते. अशावेळी अन्यायग्रस्त महिलांना आपुलकिच्या भावनेतुन मदत करावी. तसेच याबाबत सर्व महिला कार्यकत्यांनी एकत्र येवून कार्य करण्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिका-यांनी त्यांच्या जिल्हातील सामाजिक संरक्षण समितीबाबत माहिती घेवून प्रत्येक महिला काँग्रेसच्या कार्यकत्यांनी जागृक असणे आवश्यक आहे.
या वेबिनार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. जयश्री शेळके यांनी केले तर आभार ॲड. सुनिता तायडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी महिला काँग्रेसच्या कार्यकत्या ऑनलाईन उपस्थित होत्या.