मुंबई : काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने रूद्र चित्रपटाद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)पदार्पण करण्याची घोषणा केली होती. या डिजिटल चित्रपटात अजय देवगन इंटेन्स पोलिसाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. ल्युथर या ब्रिटिश मालिकेच्या (सीरिज) रिमेकवर बनणाऱ्या या सीरिजने चाहत्यांची उत्सुकता खूप वाढविली आहे. तर, यासंदर्भातील ताज्या अहवालानुसार या मालिकेच्या काही एपिसोडचा भाग बनण्यासाठी अजय देवगनला १२५ कोटी रूपयांची रक्कम दिली जाणार आहे. या करारात प्रमोशनल एक्टिविटीज, सोशल मीडिया पोस्ट्स आणि रिऍलिटी शोमध्ये पब्लिक अपीरियन्स आणि प्रोमो शुट्स यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. जर ही बाब खरी असेल तर, अजय देवगन ऋतिक रोशन, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांसह सर्वाधिक फि घेणाऱ्या ओटीटी स्टारच्या यादीत समाविष्ट होईल.
महाभारतावर आधारित चित्रपटात रिया चक्रवर्ती द्रौपदीच्या भूमिकेत? –
जर या वेबसीरिजबद्द्ल बोलायचे झाले तर, अजय देवगनने यापूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचा प्रयत्न अनोखी कथा आणि चांगल्या प्रतिभेसह काम करणे आहे. तो भारतीय एंटरटेन्मेटचा दर्जा उंच करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. अजयने त्याच्या डिजिटल पदार्पणासंदर्भात म्हटले आहे की, ‘डिजिटल दुनिया मला खूप उत्साही करत आहे. आम्ही पुढे जाऊन बीबीसी आणि अपॉलोजसह ही सीरिज डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित करणार आहोत. रूद्रा-द एज ऑफ डार्कनेस या सीरिजसह मी या नवीन प्रवासाच्या सुरूवातीची आतुरतेने वाट पाहत आहे. तथापि पोलिसाची भूमिका माझ्यासाठी नवीन नाही, परंतु यावेळी माझी भूमिका खूप तीव्र, गुंतागुतीची आणि गडद आहे. अलिकडेच्या काळात आपण अशा प्रकारची ग्रे शेड ची पात्रे पाहिली आहेत. ’
या वेबसीरिजचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर करणार असून राजेश यांनी फरारी की सवारी आणि मराठी चित्रपट व्हेंटिलेटरचे दिग्दर्शन केले आहे. तर, निर्माते अजयच्या अपोझिट इलियाना डिक्रूजला घेण्याच्या तयारीत आहेत. यावर्षाच्या शेवटी ही सीरिज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Ajay will be playing the role of Gray Shade Cop for the first time, taking huge amount for digital debut!Ajay Devgn ready for digital debut.
रकुल प्रीत सिंगने टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्ताचे केले खंडन.. –
टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्तावरून रकुल प्रीत सिंगने व्यक्त केला संताप!