अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण(Ajay Devgn) ‘शैतान'(Shaitan) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर(Supernatural thriller) चित्रटामध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले आहे.

अजय देवगणने(Ajay Devgn) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शैतान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपट येत्या 8 मार्चला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

शैतान चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आर माधवन आमने-सामने येणार आहेत. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. शैतान हा गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

Social Media