’बेलबॉटम’ चित्रपटासाठी ३० कोटी कमी करण्याच्या अफवांवर अक्षय कुमारचा खुलासा!

नवी दिल्ली : खिलाडी अक्षय कुमारचा (akshay kumar) ‘बेलबॉटम’ (Bellbottom)चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आहे. चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेमाघरे बंद झाली आणि चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘बेलबॉटम’ या चित्रपटाविषयी अशी चर्चा होती की, अक्षय कुमार ने या चित्रपटासाठी ११७ कोटी रूपये आकारले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयने चित्रपटाच्या बजेटमध्ये वाढ झाल्याने आणि प्रदर्शित होण्याच्या अनिश्चिततेमुळे निर्मात्यांच्या विनंतीवरून ३० कोटी रूपये कमी केले आहेत. यावर अक्षयने आता प्रतिक्रिया दिली आहे.

’बेलबॉटम’ चित्रपटासाठी ३० कोटी कमी केल्याच्या अफवांवर अक्षय कुमारने दिली ट्विटद्वारे प्रतिक्रिया….

Akshay Kumar reacts in a tweet to rumours of a rs 30 crore reduction for the film ‘Bellbottom’.

अक्षयने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून इमोजीद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि लिहिले आहे की, ‘सकाळी उठताच अशा प्रकारचे बनावट स्कूप्स समोर आले आहेत….’ बेलबॉटम या चित्रपटाची निर्मिती वाशु भगनानी यांनी केली आहे. वाशु यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून ही अफवा चुकीची असल्याचे म्हटले आहे. वाशु यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, या बातमीमध्ये कोणतेही सत्य नाही. बेलबॉटम एक पीरियड स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे कथानक ८०च्या दशकातील बाबींवर आधारित आहे. चित्रपटात अक्षय कुमार एका सिक्रेट एजंट (गुप्तहेर)च्या भूमिकेत दिसणार आहे.

महाभारतावर आधारित चित्रपटात रिया चक्रवर्ती द्रौपदीच्या भूमिकेत? – 

बेलबॉटम चित्रपटाचा टीझर मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत तिवारी यांनी केले आहे. चित्रपटात वाणी कपूर मुख्य भूमिकेत असून लारा दत्ता आणि हुमा कुरैशी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.
Akshay Kumar reduced his fees by 30 crores for ‘Bellbottom’! Khiladi and Vashu Bhagnani told the truth.


‘मोस्ट डिझायरेबल वुमन टीव्ही २०२०’च्या यादीत अभिनेत्री एरिका फर्नांडिस अव्वल स्थानी….

अभिनेत्री एरिका फर्नांडिस बनली ‘मोस्ट डिझायरेबल वुमन टीव्ही २०२०’!

Social Media