बच्चन पांडेच्या ‘फ्लॉप’बद्दल अक्षय म्हणाला – काश्मीर फाइल्सने चित्रपट बुडवला

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे बच्चन पांडे (Bachchan Pandey) चित्रपट ‘फ्लॉप’ झाल्याचे म्हटले आहे.. अक्षय कुमार(Akshay Kumar) म्हणाला की लोकांना विवेक रंजन अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files)इतका आवडला की त्याचा चित्रपट बच्चन पांडे फ्लॉप झाला.. भोपाळ येथे आयोजित चित्र भारती चित्रपट महोत्सवात खिलाडी कुमार बोलत होते. यावेळी काश्मीर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीही मंचावर उपस्थित होते.

माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “पाहा, आपल्या सर्वांना देशात घडणाऱ्या आणि घडलेल्या कथा सांगायच्या आहेत, काही सुप्रसिद्ध, काही न ऐकलेल्या, जसे की विवेक  यांनी काश्मीर फाइल्स तयार केला आहे. आपल्या देशातील  एक अतिशय वेदनादायक सत्य समोर आले आहे. हा चित्रपट  सर्वांना हादरवून सोडणारी लाट म्हणून आला. त्यात माझा चित्रपटही बुडाला  ही दुसरी बाब आहे.

बच्चन पांडेला हटवून काश्मीर फाइल्स पाहणारे लोक

उल्लेखनीय आहे की, ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही लोकांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह कमी होत नाहीये. या चित्रपटाने खर्चाच्या जवळपास 10 पट कमाई केली आहे. दरम्यान, अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपटही प्रदर्शित झाला पण प्रेक्षकांनी त्यात फारसा रस दाखवला नाही. काही ठिकाणी अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवून लोकांनी The Kashmir Files पाहिला.


Dr. Nagraj Manjule : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान !

Kashmir Files :200 कोटींचा टप्पा पार; ‘द काश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास !

Social Media