‘पुष्पा’ची क्रेझ अजून संपलेली नाही, अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने आता रचला नवा विक्रम

मुंबई : ब्लॉकबस्टर ‘पुष्पा – द राइज’ (Pushpa – The Rise) रिलीज जवळजवळ एक वर्ष लोटला मात्र पुष्पा चा फिवर अजुनही कमी होत नाहीये… अल्लू अर्जुन(Allu Arjun) स्टार लोकप्रियतेच्या बाबतीत नवीन उंची गाठत आहे. 5 अब्ज व्ह्यूज मिळवणारा भारतातील पहिला अल्बम बनून चित्रपटाने आणखी एक विक्रम केला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “भारतीय चित्रपटातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराक्रम. आयकॉन स्टार अभिनेता अल्लू अर्जुन(Icon star actor Allu Arjun) ऑनलाइनचा हॅशटॅग – पुष्पा द राइज हा 5 बिलियन व्ह्यूज मिळवणारा पहिला अल्बम आहे.

चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून ते चित्रपटगृहात प्रदर्शित होईपर्यंत ‘पुष्पा'(Pushpa) धुमाकूळ घालत होता. ‘सामी सामी’पासून ‘आये बिद्दा ये मेरा अड्डा’पर्यंत या चित्रपटाच्या गीतांना भारतीयांनी टाळ्या वाजवल्या. ‘ओ अंटवा ऊ अंटावा’ हे वर्षातील सर्वात मोठे पार्टी गाणे ठरले. सुकुमार दिग्दर्शित, ‘पुष्पा: द राइज’ ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आणि हिंदी पट्ट्यात 100 कोटींचा टप्पाही पार केला. याने जगभरात 300 कोटी रुपये कमावले.

कशी असेल ‘पुष्पा 2’ची कथा?

पुष्पा 2 च्या कास्टिंगबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. चित्रपटाच्या पुढील भागासाठी हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये ऑडिशन्स सुरू आहेत. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच ऑडिशनमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी दुसऱ्या भागात विजय सेतुप्तहीची निवड केली आहे, त्यामुळे या चित्रपटात ‘पुष्पा’ कधी झुकणार की नाही हे पाहावं लागेल.

आताच या बातम्या समोर आल्या होत्या की पुष्पा 2 मधील विजय सेतुपतीचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजय सेतुपतीच्या चाहत्याने बनवलेले हे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर पुष्पाने हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषेत कॅप्शनसह शेअर केले आहे.


सुष्मिता सेन-ललित मोदींची प्रेमकहाणी, उघडपणे व्यक्त केले प्रेम

 रियाने सुशांत सिंह राजपूतला अनेकदा गांजा दिला होता : एनसीबी 

Social Media