विदर्भासोबतच राज्याची रेमडेसीवीरची गरज पूर्ण होणार: नितीन गडकरींच्या प्रयत्नातून वर्धा येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरु

मोठी दिलासादायक बातमी

नागपूर दि. ६ : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे राज्यात वर्धा येथे जेनेटीक लाईफ सायन्सेस व्दारे रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन आज पासून सुरु झाले असून रविवार पर्यंत एक लाख वायल मिळतील तर  रोज तीस हजार रेमडेसिवीरचे उत्पादन केले जाणार आहे.

रोज दोन लाख इंजेक्शनची पँकींग शक्य(Two lakh injections possible every day)

गडकरी यांनी स्वत: वर्धा येथे जेनेटीक लाईफ सायंन्सेसच्या उत्पादन प्रकल्पाला आज भेट दिली. प्रकल्पांची टेस्टिंग यश स्वी झाल्यानंतर आजपासून उत्पादन सुरू झाले आहे. जर प्लास्टिकच्या बाटल्या मिळाल्या तर येथे रोज दोन लाख इंजेक्शनची पँकींग शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे विदर्भासोबतच राज्याची इंजेक्शनची गरज पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

वर्धा येथील जेनेटीक लाईफ सायन्सेंस सोबत करार(Agreement with Genetic Life Sciences, Wardha)

अमेरीकी कंपनी जीलेड कडे रेमडेसिवीरचे पेटंट आहे. ज्याचे भारताच्या सात कंपन्यांसोबत करार करून उत्पादन परवाने देण्यात आले आहेत.  या पैकी एक हेट्रो फार्मा सोबत गडकरी यांनी वर्धा येथील जेनेटीक लाईफ सायन्सेंस सोबत करार केला. लोन बेसीस वर हेट्रो फार्मा वर्धाच्या जेनेटीक फार्मा मध्ये रेमडेसिवीर चे उत्पादन करत आहे.  त्याला गडकरी यांच्या प्रयत्नाने  महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता देण्यात आली आहे.

राज्याची इंजेक्शनची गरज पूर्ण होणार(The state’s injection requirement will be fulfilled)

रेमडेसिवीरच्या या उत्पादनासाठी कच्चा माल विदेशातून येतो. मात्र अनेक प्रयत्नातून तो मिळवण्यात यश आले आहे. प्रकल्पांची टेस्टिंग यश स्वी झाल्यानंतर आजपासून उत्पादन सुरू झाले आहे. जर प्लास्टिकच्या बाटल्या मिळाल्या तर येथे रोज दोन लाख इंजेक्शनची पँकींग शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे विदर्भासोबतच राज्याची इंजेक्शनची गरज पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

Due to the consistent efforts of Union Minister Nitin Gadkari, the production of Genetic Life Sciences Vare Remdecivir Injection at Wardha in the state has started from today and one lakh vials will be received by Sunday while 30,000 remdecivirs will be produced daily.

Social Media