त्वचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त कोरफड; जाणून घ्या कोरफडीचे 5 फायदे!

कोरफडीचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी  जातो. कोरफड चेहऱ्यावरील  डाग आणि  त्वचेवरील  कोरडेपणा  कमी करून त्वचा सॉफ्ट आणि मुलायम  बनवते. कोरफड केवळ सौंदर्यच नाही तर केस, वजन कमी करणे, मधुमेह आणि ऍसिडीटी  कमी करण्यासाठी फायदेशीर देखील मानले जाते. कोरफड मध्ये अँटीवायरल आणि इंन्फ्लेमेंट्र गुणधर्म आहेत. कोरफड एक आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापरला जातो. कोरफड  जेल चवीमध्ये अतिशय कडवट असते, परंतु त्याचा रस बर्‍याच रोगांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर जाणून घेवूया  कोरफडचे  फायदे….

कोरफड वापरण्याचे 5 उत्तम फायदे
1. त्वचा : कोरफड त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी कार्य करते. हे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यातही मदत करू शकते. कोरफड  जेल जळलेल्या भागावर लावल्यास थंड आणि जखम भरण्यास मदत करते.
2. स्क्रब : तुम्ही कोरफड  स्क्रब बनवू शकता, स्क्रब बनवण्यासाठी, कोरफड जेल, साखर आणि लिंबाचा रस एकत्र मिसळा.  त्वचेवरील  मृत कोशिका नाहीशा करून  त्वचा मऊ करण्यासाठी  कार्य करू शकते.

3. मुरूम (पिंपल्स) :  चेहऱ्यावर मुरुम असल्यास कोरफड वापरणे फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला मुरुमांमुळे त्रास होत असेल तर मग कोरफड जेल आणि मध यांचे मिश्रण  चेहऱ्यावर लावा, यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

4. वजन कमी होणे : कोरफड  रस वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते, कारण कोरफड मध्ये व्हिटॅमिन आणि फायबरचे पर्याप्त गुणधर्म आढळतात. जे वजन कमी करण्यात मदत करू शकते.

५. केस : कोरफड हे केस गळती रोखण्यासाठी  उत्तम कार्य करते. हे आपले केस मऊ, चमकदार आणि कोंडा मुक्त करण्यात मदत करू शकते. एलोवेरा जेल केस पांढरे होण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

 

Social Media