अमेरिकेला Delta variant चा मोठा धोका : वैज्ञानिक डॉक्टर फॉसी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अव्वल वैज्ञानिक आणि व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्‍टर एँथनी फौसी यानी देशाला असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूचे बदललेले रूप डेल्टा व्हेरिएंटचा प्रचंड धोका आहे. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, अमेरिकेत येणाऱ्या सुमारे २० टक्क्यांहून अधिक नवीन प्रकरणांमध्ये यामुळेच वाढ झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुमारे १० टक्के प्रकरणातच हा व्हेरिएंट समोर आला होता. ज्या प्रकारची परिस्थिती अमेरिकेत आहे अशीच परिस्थिती ब्रिटनमध्ये देखील दिसून येत आहे.

डेल्टा व्हेरिएंटपासून अमेरिकेला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता : वैज्ञानिक डॉक्टर फॉसी

Us needs to be careful from Delta variant: Scientist Doctor Fauci

पत्रकार परिषदेत डॉक्टर फॉसी यांनी सांगितले की, या दरम्यान एक चांगली बाब अशी आहे की अमेरिकेत तयार केलेली कोरोना वॅक्सीन विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटवर देखील प्रभावी आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी एँड इन्फेक्शन डिसिजच्या प्रमुखांच्या मते, याचा निष्कर्ष असा आहे की जेथे अमेरिकेला या व्हेरिएंटचा धोका आहे परंतु आमच्याकडे याला रोखण्यासाठी एक प्रभावी उपाय देखील आहे. त्यामुळे या व्हेरिएंटला नष्ट करण्यासाठी याचा संपूर्ण वापर केला गेला पाहिजे.

महत्वाचे म्हणजे डेल्टा व्हेरिएंटचे सर्वात पहिले प्रकरण भारतात आढळले होते. त्यानंतर जगातील सुमारे ६० हून अधिक देशांनी याची प्रकरणे समोर आल्याची पुष्टी केली आहे. जागतिक आरोग्य संस्थेने या व्हेरिएंटला पूर्वीच व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणजेच धोकादायक किंवा प्राणघातक असल्याचे मानले आहे. डॉक्टर फॉसी यांचे म्हणणे आहे की, डेल्टा व्हेरिएंटचा हळूहळू ब्रिटनमध्ये देखील प्रसार होत आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या अल्फा व्हेरिएंटला देखील डब्ल्यूएचओने या यादीत समाविष्ट केले आहे. तथापि अल्फापेक्षाही घातक डेल्टा व्हेरिएंट असल्याचे मानले आहे.

ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या सुमारे ९० टक्के नवीन प्रकरणांचे कारण डेल्टा व्हेरिएंट आहे. ब्रिटनच्या इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनद्वारा करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, ब्रिटनमध्ये ५-१२ आणि १८-२४ वर्ष वयोगटातील लोकांना याचा धोका अधिक आहे तर, ६५ वर्षावरील लोकांना याचा धोका कमी आहे. या संशोधनात एक लाख घरांचा समावेश होता. डॉक्टर फॉसी यांनी सांगितले की, जर आपण अमेरिकेची आकडेवारी पाहिली तर असे समजते की येथे डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हेरिएंटपासून अमेरिकेला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे
America recovering from epidemic is at great risk from delta variant, statement of top scientist Dr. Fauci.


अमेरिकेत झालेल्या संशोधनात कोरोना व्हेरिएंट संदर्भात एक दावा ! –

कोरोना विषाणूचे व्हेरिएंट वेगाने का पसरत आहेत याचा अमेरिकन संशोधनाने केला खुलासा !

भारत बायोटेकने ‘कोवॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती सरकारकडे सोपविली –

भारत बायोटेकने ‘कोवॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती सरकारकडे सोपविली : सुत्र

Social Media