अमेरिकन सुपर मॉडेल गिगी हदीद चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी वापरते टूथपेस्ट

अमेरिकन सुपर मॉडेल गिगी हदीदने(gigi-hadid) काही महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला. गरोदरपणातही ही मॉडेल सोशल मीडियावर सक्रिय होती. या महिन्यात ती व्होग मॅगझिनची कव्हर गर्ल होती. यासह तिने तिच्या त्वचेची देखभाल आणि सौंदर्याच्या काही टिप्स सामायिक केल्या आहेत. गिगीने सांगितले की ती गर्भवती असताना तिने नैसर्गिक उत्पादनांवर भर दिला..american-supermodel-gigi-hadid

चेहऱ्यासाठी  चांगली उत्पादने

हिवाळ्यात, मॉडेल तिच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरते. मॉडेल म्हणाली, “बहुतेक लोकांना असे वाटते की मी फक्त लक्झरी आणि महागड्या वस्तू वापरते पण तसे नाही. मी माझ्या चेहऱ्यासाठी  चांगली उत्पादने वापरते.” असे ती म्हणाली.

बर्‍याच मुलींना एकाच ब्रशने एकत्र मेकअप केले जाते

तिने सांगितले की तिला त्वचेची कोणतीही समस्या नाही. परंतु फॅशन वीक दरम्यान  संपूर्ण दिवसासाठी मेकअप(Makeup) लावण्याने माझ्या त्वचेवर परिणाम झाला कारण त्या वेळी बर्‍याच मुलींना एकाच ब्रशने एकत्र मेकअप केले जाते, ज्यामुळे एक ब्रश अनेक चेहऱ्यांना स्पर्श करते. यामुळे त्यांच्या हनुवटी आणि नाकावर डाग पडतात..

मॉडेलने सांगितले की तिला स्वतःचा लुक स्वत:च  तयार करायला आवडते. गीगी म्हणाली की मी काळ्या डागांना कोरडे(ड्राय) करण्यासाठी ती टूथपेस्ट वापरते. ही टीप तिला तिच्या आईकडून मिळाली. तिने सांगितले की ती तिच्या भुवयांवर(आयब्रो) लीप बाम लावते जेणेकरून पेन्सिल किंवा कोणतेही उत्पादन तिच्या भुवयांवर सहजतेने फिरू शकतील.

पिगमिंटेशन

गर्भधारणेदरम्यान गिगीच्या त्वचेवर पिगमिंटेशन(Pigmentation) उद्भवले होते, ज्यामुळे डोळ्यांच्या खाली काळे डाग झाले होते. तिने सांगितले की गर्भधारणेदरम्यान हे स्वाभाविक आहे, काही दिवसांनी ते बरे होतात. मला हे माहित होते.

 मेकअप टिप्स

मेकअपबद्दल तिने सांगितले की ती तिच्या चेहऱ्यावर किंचित प्राइमर आणि फाउंडेशन लावते करते आणि ती तिच्या हातांनीच चेहऱ्यावर पसरवते जेणेकरून पूर्ण चेहरा सहज कव्हर होईल. यानंतर, डोळ्यांच्या खाली कन्सीलर लावते आणि नंतर पेन्सिलच्या मदतीने भुवयांना आकार देते. चेहऱ्यावर ती हलका पावडर लावते कारण त्यामुळे मेकअप व्यवस्थित सेट होण्यास मदत होते. त्यावर ती काऊटरिंग पावडर आणि नाकावर  हायलाईटर वापरते. पापण्यांना मस्कारा लावून आयशॅडोला कर्ल करते. यानंतर, ती गालांवर ब्लशर लावते आणि मग लिपस्टिकचा कोट लावत असल्याचं तिने सांगितलं…

गिगी म्हणाली की मुलाच्या संगोपनामुळे काहीवेळा एक आठवडा देखील बिना मेकअपचा निघून जातो. त्यांचा असा विश्वास आहे की बाळाच्या आईने स्वत:ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

 

हेही वाचा…

चेहरा आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

Social Media