मुंबई : अभिनेत्री अमिषा पटेल हिचे हॅक झालेले इन्स्टग्राम( Instagram ) अकाउंट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी विक्रमी वेळात रिकव्हर करून दिले आहे.
४ जानेवारी रोजी अभिनेत्री अमिषा पटेल हिने आपले इंस्टाग्रामचे अकाउंट हॅक झाले आहे या बाबतची तक्रार महाराष्ट्र सायबर कडे केली होती . या अभिनेत्रीला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक डायरेक्ट मेसेज आला होता .त्या मेसेजमध्ये ” Account will be suspended within 24 hours for violating Instagram’s Copyright Law ” अशा आशयाचा एक मेसेज आला होता . हा फिशिंग प्रकारचा सायबर गुन्हा आहे असे प्रथमदर्शनी भासत होते . कारण हा इंस्टाग्रामकडूनच आल्याचे भासविण्यात आले होते .तसेच मेसेज बरोबर एक ‘ Copyright Objection Form ‘ लिंक पण देण्यात आली होती.या लिंकवर सदर अभिनेत्रीने घाबरून क्लिक केले व तिला एका तोतया इंस्टाग्राम वेबसाईटवर डायरेक्ट केले गेले व लगेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट लॉक झाले . महाराष्ट्र सायबर ने परिस्थितीचे अवलोकन व गांभीर्य ओळखून सदर अभिनेत्रींचे अकाउंट पुनर्जीवित करण्यासाठी तिची परवानगी घेतली व तात्काळ तपास सुरु केला.
हॅकरने ते अकाउंट लॉक केले होते व त्यामधील पोस्ट्स डिलीट केल्या होत्या. तपास करताना असे निदर्शनास आले की मेसेज मध्ये दिलेली लिंक हि एका नेदरलँड मधील होती तर IP address हा तुर्कस्थान मधील होता. या वरून सदर गुन्ह्याचे गांभीर्य आणि किचकटपणा समोर येतो. या गुन्ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतो याचा विचार करून व पुढील परिणाम टाळण्यासाठी महाराष्ट्र सायबरची तुकडी कामास लागली. त्यांनी लगेच इंस्टाग्रामच्या नोडल ऑफिसला संपर्क करून व पाठपुरावा करून सदर अकाउंट काही वेळातच रिकव्हर करून दिला. अशाच प्रकारची घटना हि अभिनेते शरद केळकर यांच्या बाबत देखील घडली व महाराष्ट्र सायबरने कशोशी ने प्रयत्न करून ते देखील रिकव्हर करून दिले आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि सर्व नागरिकांनी आपले सोशल मिडिया अकाउंट वापरताना २ way ऑथेंटिकेशन प्रणालीचा वापर करावा इंस्टाग्राम अकाउंटवरुन येणारे अधिकृत मेसेज हे Settings > security > emails from Instagram असे दिसतात या घोटाळ्यासंबंधीची मार्गदर्शिका महाराष्ट्र सायबर ने आधीच प्रसारित केली आहे.
हा सर्व तपास विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शना खाली मा उप महानिरीक्षक हरीश बैजल यांच्या निरीक्षणाखाली विजय मेरे उपअधिक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर संदीप पाटील , हेड कॉन्स्टेबल संतोष बोडके यांनी मर्थ तपस विक्रमी वेळात पूर्ण करून अकाउंट रिकव्हर करून दिले . या जलद व योग्य कारवाई निमित्त तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर यशस्वी यादव यांनी रुपये १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
Tag-Actress Amisha Patel’s Instagram account hacked