अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून अवैध घोषित

नागपूर : अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून ते रद्द करीत त्यांना 2 लाख रुपयांचा दंड ही ठोठावला आहे.

हे जात प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत माजी खासदार आणि राणा यांचे समोर पराभूत झालेल्या शिवसेनेच्या आनंद अडसुळ यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल घोषीत करण्यात आला,न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिष्ट यांच्या खंडपीठाने आज हा निकाल दिला.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा घोटाळा असल्याचे असे मत नोंदवून हे जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना २ लाखाचा दंडही ठोठावला आहे. तसेच हे खोटं जात प्रमाणपत्र ६ आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.
आनंद अडसुळ यांच्या वतीने ऍड सी.एम.कोरडे, अॅड.प्रमोद पाटील व ऍड सचिन थोरात यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या निकालामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आपण आदर करीत असून त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून तिथे आपल्याला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर दिली आहे.

The Nagpur bench of the High Court has declared amravati MP Navneet Rana’s caste certificate invalid and quashed it and imposed a fine of Rs 2 lakh on him.


केंद्राने घेतलेली लसीकरणाची जबाबदारी नीट पार पाडावी : बाळासाहेब थोरात –

सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर मोदी सरकारला आली जाग!: बाळासाहेब थोरात

Social Media