एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

एनिमिया म्हणजे काय..?

ऍनिमियामध्ये(Anemia) रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC (Red Blood Cell) ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील उतींपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे कार्य करत असतो. मात्र कोणत्याही कारणाने RBC ची संख्या कमी झाल्यास किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेंव्हा शरीरातील विविध अवयवांच्या उतींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही.

अयोग्य आहार यामुळे आपल्याकडे अनेक लोक ऍनिमियाने (Anemia)त्रस्त आहेत. विशेषतः सर्व वयोगटातील महिलांमध्ये ऍनिमियाचे(Anemia) प्रमाण चिंताजनक आहे.

ऍनिमियाचे प्रकार(Types of anemia)

अनीमियाचे अनेक प्रकार असून ते अनेकविध कारणांनी होतात. जसे,

1) Iron deficiency Anemia – रक्तातील
लोहाच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.
2) Pernicious Anemia – विटामिन B12 च्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.
3) Megaloblastic Anemia – फॉलिक
एसिडच्या कमतरतेमुळे होणारा एनीमिया.
4) Sickle cell diseases, Thalassemia
जेनेटिक कारणांमुळे या प्रकारचा एनीमिया होतो

अनिमिया आजाराची कारणे -(Causes of anemia)

◼️रक्तस्त्राव झाल्याने अनीमिया उद्भवू शकतो. प्रामुख्याने अपघात, शस्त्रक्रिया, विविध कैन्सर, अल्सर, मुळव्याध, मासिक पाळी यांमुळे होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनीमिया
उद्भवतो.

◼️विविध विकारांमध्ये एनीमिया हे लक्षण आढळते. जसे किडनी फेल्युअर, आमवात,
संक्रामक TB, विविध कैन्सर,
हायपोथायरॉडिजम, रोगप्रतिकारक क्षमतेचे
विकारांमध्ये रक्ताल्पता अनीमिया हे लक्षण आढळते.
भोजनातील लोह, विटामिन B12, फॉलिक
एसिडच्या कमतरतेमुळे,

◼️योग्य वयापुर्वीच गर्भावस्था येणाऱ्या स्त्रियांमध्ये,
मासिकस्त्रावावेळी अधिक रक्त स्त्राव झाल्याने महिलांमध्ये,
आतड्यातील कृमींमुळे.

एनीमियाची लक्षणे –

✅ रक्तस्त्रावयुक्त मुळव्याधीच्या विकारांनी पिडीत रुग्णांमध्ये अरक्तता उत्पन्न होते. शरीर पांढरे पडणे, त्वचा पांढरी, निस्तेज
होणे,

✅ चक्कर येणे, शारीरीक दुर्बलता, थकवा जाणवणे,छातीत धडधडणे,

✅ भूक मंदावणे, चेहरा, पाय, शरीरावर सुज आलेली आढळते,

✅ अल्प परिश्रमानेसुद्धा धाप लागणे.

✅ त्वचा, नखे निस्तेज रुक्ष होतात, नखे सहज तुटु लागतात, नखे चपटी होतात.

एनिमिया होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी-(Here’s how to take care to prevent anemia:)

पोषकतत्वयुक्त संतुलित आहार घ्यावा. विशेषता लोह, फॉलिक एसिड, जीवनसत्व ब12 ह्या पोषकतत्वांनी युक्त आहार घ्यावा. मद्यपान, धुम्रपान इ. व्यसनांपासून दूर राहावे.
गर्भावस्थेमध्ये एनीमिया उत्पन्न होऊ नये यासाठी डॉक्टरांनी दिलेली लोह आणि फॉलिक एसिडची औषधे वेळच्यावेळी घ्यावीत. मासिक पाळीमध्ये अधिक स्त्राव येत असल्यास स्त्रीरोग तज्ञांद्वारा उपचार करुन घ्यावेत.

अधिक काळापर्यंत अनीमियाची स्थिती राहिल्यास, शारीरीक दुर्बलता निर्माण होते, कार्य करण्याची क्षमता कमी होते, हृदयावर अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे यावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. एनीमियामध्ये शारीरीक दुर्बलता कमी करण्यासाठी उपचार योजले जातात. पूरक औषधे, व्हिटॅमिन दिले जाते.
रक्त कमी असल्यास रुग्णास रक्त चढवले जाते,ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. काहीवेळा व्हिटॅमिन बी 12 च्या आवश्यकता असते. रक्तस्त्राव झाल्यास किंवा हिमोग्लोबिनची पातळी खूप कमी असल्यास, रक्त चढवण्याची आवश्यकता भासू शकते.

परंतु बर्‍याच वेळा एवढे करूनही रक्ताची/हीमोग्लोबिन ची पातळी वाढत नाही. आहारातील लोह, व्हिटॅमिन बी 12(Vitamin B12) आणि फोलेटची कमतरता झाल्यामुळे एनीमियाची स्थिती निर्माण झालेली असल्यास पौष्टिक पूरक आहार घेतला पाहिजे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात पालक, लाल माठ यासारख्या हिरव्या भाज्या समाविष्ट कराव्यात. तसेच काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, बीट, सफरचंद यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असल्याने ही फळे जरूर खावीत.

●याशिवाय दूध व दुधाचे पदार्थ, नारळ, शेंगदाणे,तीळ, गुळ, मसूर डाळ, मोड आलेली कडधान्ये, सुखामेवा, अंडी, मांस, मासे, चिकन यांचाही आहारात समावेश असावा. यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

Social Media