नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ED अर्थात सक्तवसुली संचालनालया ने आज सकाळी 8 वाजता छापा टाकला, E D च्या 5 अधिकाऱ्यांचे एक पथक सकाळी 8 वाजता अचानक देशमुखांच्या घरी धडकले आणि त्यांनी आपली चौकशी सुरु केली.
खबरदारी चा उपाय म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख( Anil Deshmukh) यांचा घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर स्थानिक पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. नागपुरात आपल्या घरी ही कारवाई होत असतांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख( Anil Deshmukh) मुंबईत असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा अनुपस्थितीत अनिल देशमुख यांचे कुटुंब अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याचे समजते.
आज सकाळीच ईडी चे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरावर धडकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. ED ने टाकलेली ही धाड़ अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. केवळ स्थानिक पोलिसांची मदत बंदोबस्ताकरीता घेण्यात आली आहे.
Former Home Minister Anil Deshmukh’s house in Nagpur was raided by the directorate of ED, the Directorate of Recovery, at 8 am today, a team of 5 officers of E D suddenly stormed Deshmukh’s house at 8 am and started his inquiry.