मुंबई : धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे नेहमीच तडाखेबंद वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश करणा-या आण्णा गोटे यांनी जनहिताच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दहा दाहक सवाल केले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील असेही त्यांनी म्हटले आहे.
१ महाराष्ट्राच्या पोलीसांची यथेच्छ बदनामी करुन अमली पदार्थाच्या अहारी गेलेल्या. एकाच वेळी चार चार नट्यांच्या लफड्यात आकंठ बुडालेल्या सुशांत सिंग प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवून आपण काय राजकीय लाभ पदरात पाडून घेतला.
2 आघाडी सरकार मधील ज्या कुणा युवा नेत्या पर्यंत आपणास पोहचण्यात अजूनही का बरे यश आले नाही.
3 आपल्या पक्षाचे आदर्श चारित्र्यवान नेते आमदार राम कदम यांच्या कडे अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या खात्रीची व्हिडिओ टेप कशी आली?
4 कै. प्रमोद महाजन यांचे अत्यंत खाजगीतले खाजगी सचिव विवेक मैत्रा यांचा (हत्ये?) अथवा मृत्यू कशामुळे झाला? त्याच्या CBI चौकशीसाठी आकाश पाताळ एक न करण्यामागील कारणे काय?
5 भाजपाचे देव ध्यानी आमदार राम कदम व राहूल महाजन एका भक्तीनी समवेत जे काही करीत आहेत ती कन्या व रिया किंवा दिपा एकच आहेत का? नसतील तर यात्रा कंपनीची सदस्य ही भक्तीन कोण?
6 इम्तियाज खत्री याचा ह. भ. प. आमदार राम महाराज यांचेशी नेमका संबंध कुठल्या पातळीवरील आहे? म्हणजे मैत्री? नुसता परिचय? चीरपरीचय? भागिदारी? व्यावसायिक? मतदारसंघातील कार्यकर्ते?
7 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चरित्रात्मक चित्रपटाची निर्मिती (biopic) करणारा अमली पदार्थाची तस्करी करणारा संदिप सिंग यांच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 117 कोटी रुपयांचा खर्च आला. हा खर्च पक्षाने केला की संदिप सिंग यानेच केला?
8 भाजपाचे व संदिप सिंग याचे नेमके संबंध कुठल्या पातळीवरील आहेत? पक्ष पदाधिकारी? पक्ष नेता? पक्षाच्या आर्थिक आघाडीची जबाबदारी स्वीकारून काम करणारा? सिने सृष्टीचा संपर्क मंत्री? 117 कोटी ही रक्कम भाजपला किरकोळ असेल. कारण व्हिज्युअल सभेसाठी बिहार मधे148 कोटी खर्च करणाऱ्या जगातील सर्वात श्रीमंत पक्षासाठी खरोखरच किरकोळ आहे. गरीबांच्या माहितीसाठी खुलासा करावा.
9 मुंबई पोलिसांच्या पेक्षा सी. बी आय ने नेमका वेगळा काय तपास केला. INVESTIGATION AND ENQUIRY यापैकी केंद्रीय तपासी यंत्रणा काय करीत आहे?
10 मुंबई पोलिसांच्या तपासी यंत्रणेने एकही अटक केली नाही. सीबीआयने पण या पेक्षा नेमके जास्त काय केले
यानंतर नेमका कुणाच्या राजीनाम्याची किंवा हकालपट्टीची मागणी अजेंड्यावर आहे.