सध्या देशात नाही तर जगभरात लक्षद्वीपची(Lakshadweep) चर्चा होत आहे. जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही जर विमानाने लक्षद्वीपला जायचा विचार करत असाल तर तुम्हाला कोचीच्या अगाट्टी विमानतळासाठी विमानाचे तिकीट बुक करावे लागेल. कोची ते लक्षद्वीप बेटापर्यंतचे हे एकमेव विमानतळ आहे.
अगत्ती बेटावर पोहोचल्यानंतर, तुम्ही येथून बोटीने किंवा हेलिकॉप्टरने सहजपणे इतर बेटांवर जाऊ शकता. अनेक विमान कंपन्या लक्षद्वीप बेटावर थेट विमानसेवा देत आहेत. जर आपण दिल्ली ते लक्षद्वीप फ्लाइट तिकिटाचे भाडे बद्दल बोललो, तर ते प्रत्येकी 10 हजार रुपयांपासून सुरू होते.
तुम्ही जर लक्षद्वीपसाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एक महिना अगोदर फ्लाइट तिकिट बूक करावे. आधी बुकिंग केल्यास तुम्हाला ते स्वस्तात मिळेल. प्रवास खर्च वगळता तुम्ही 25,000 ते 30,000 (प्रति व्यक्ती) रुपयात लक्षद्वीप(Lakshadweep) फिरु शकता.