लेह : लडाखमध्ये(Ladakh) लष्कराच्या वाहनाला दुर्देवी अपघात झाला असून या अपघातात ९ जवान शहीद झाले आहेत. तर यात एक जवान जखमी झाला आहे. झालेल्या अपघाताच्या बातमीला लडाखच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला. ही दुर्घटना दक्षिण लडाखच्या न्योमामधल केरे येथे झाली. घटनास्थळी तातडीने बचावकार्य करण्यात आले. कारू गॅरीसनवरून क्यारीच्या दिशेने लष्करी जवानांचे वाहन जात होते शनिवारी संध्याकाळी ते वाहन खोल दरीत कोसळले. या वाहनात एकूण १० जवान प्रवास करत होते.
झालेल्या अपघतात ९ जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जखमी जवानांना फिल्ड रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे आणि ट्वीट करत लडाखच्या लेह येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद जवानांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. देशासाठी त्यांनी केलेली सेवा नेहमीच लक्षात राहील. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती कायम आहे. ते ही लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो, असे त्यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.एका रिपोर्ट्सनुसार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान कियारी येथन ७ किमी आधी दरीत वाहन कोसळले.