तुरुंगातून बाहेर येताच आर्यन खानने केले हे काम !

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आर्यन खानला 25 दिवसानंतर जामीन मिळून त्याची सुटका झाली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जामिनावर सुटल्यानंतर घरी परतला आहे. आर्यनच्या घरी आल्यानंतर किंग खानच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, आर्यन खानने घरी येताच त्याच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया हँडलमध्ये बदल केला आहे. आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवरील डिस्प्ले पिक्चर म्हणजेच डीपी काढून टाकला आहे.

याआधी तुम्ही आर्यन खानचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असते तर त्याने डीपी टाकला होता, पण ‘मन्नत’मध्ये परत आल्यानंतर आर्यनने डीपी काढून तो ब्लॉक रिकामा ठेवला आहे. मात्र, त्याने त्याची कोणतीही पोस्ट डिलीट केलेली नाही. आर्यनचे सर्व फोटो तसेच आहेत.

आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २ ऑक्टोबरला ताब्यात घेतले होते. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकून एनसीबीने आर्यनला रेव्ह पार्टीतून अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबरला आर्यनला एनसीबीने अटक केली. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी त्याची सुटका करण्यासाठी सत्र न्यायालय ते दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु प्रत्येक वेळी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. पण अखेर 25 दिवसांनंतर 28 ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टाने आर्यनला जामीन मिळाला. या प्रक्रियेदरम्यान आर्यनला जवळपास 25 दिवस मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागले. आता आर्यन जामिनावर सुटल्यानंतर मन्नतमध्ये आला आहे.

25 दिवसांनी घरी परतल्यानंतर आता शाहरुख खान आणि गौरी खानने मुलगा आर्यनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, आर्यन खानच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता शाहरुख खानचा पर्सनल बॉडीगार्ड त्याच्यासोबत असेल आणि आर्यन खानबद्दल अभिनेत्याला माहिती देईल.

शाहरुख खानच्या पर्सनल बॉडीगार्डचे नाव रवी सिंग आहे, जो नेहमीच अभिनेत्यासोबत सावलीसारखा राहतो, पण आता तो आर्यन खानचा पर्सनल बॉडीगार्ड बनला आहे.

 

Social Media