ज्योतिषशास्त्र विषयातील उत्तम वक्ता म्हणून संजय मुळे यांची निवड

ईशा कोप्पीकर यांच्या हस्ते गौरव

मुंबई : कॉर्पोरेट मंत्रालयाशी संलग्न असलेल्या थ्री फिंगर्स लि. तर्फे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली ज्योतिषशास्त्र विषयावरील वादविवाद स्पर्धा छत्रपती संभाजी नगरचे उद्योजक श्री. संजय मुळे यांनी जिंकली असून या विषयातील उत्तम वक्ता म्हणून त्यांचा प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर(Isha Koppikar) यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमातील ज्योतिषशास्त्र विषयावरील वादविवाद स्पर्धेत संजय मुळे यांनी सहभाग घेतला होता. यात अनेक नामवंत ज्योतिषाचार्य सहभागी झाले होते.

यापुर्वी संजय मुळे यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला असून यात द एक्सलंसी आयकॉनिक ॲवॉर्ड आणि फाव ॲण्ड फेअर्स यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ‘बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर’, महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराचा समावेश आहे. याशिवाय नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार, एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारानेही संजय मुळे यांचा गौरव करण्यात आला आहे.

Social Media