औरंगजेबची कबर हटवण्यासाठी आता शिवसेना मंत्र्यांसह आमदार आक्रमक….!

विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन

मुंबई : आपण आता केवळ आमदार नसून घटनेची शपथ घेतलेले राज्याचे मंत्री आहोत याचा बहुदा विसर पडलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी आपल्या आमदारांसोबत विधानभवनाच्या पायऱ्यांवर औरंगजेबची कबर(Aurangzeb’s grave) हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन येणारे जाणारे उच्च पदस्थ अधिकारी व सुरक्षा कर्मचारी एकदम अवाक् झाले.

छत्रपती संभाजी महाराजांचा(Chhatrapati Sambhaji Maharaj) क्रूर छळ करणाऱ्या औरंग्याची कबर तातडीने हटवावी अशा घोषणा लिहिलेले फलक झळकावत या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विजय शिवतारे, संतोष बांगर, डॉ.मनीषा कायंदे,संजय गायकवाड यासह अनेक आमदार उपस्थित होते.

औरंग्याचा धिक्कार करत शिवसेना आमदारांनी कबर हटवण्याची मागणी केली.औरंग्याची कबर हटवून तिथं केवळ थडगं ठेवा.आणि थडग्याजवळ चार जोडे ठेवावेत म्हणजे येणारे जाणारे थडग्याला जोडे मारतील, अशी टीका यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी केली. औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी आ.संतोष बांगर यांनी केली.शंभू राजांचा अमानूष छळ करणाऱ्या औरंग्याची कबर उखडून टाका असे बॅनरही यावेळी शिवसेना आमदारांनी झळकवले.


महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट : प्रकाश आंबेडकर

खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *