बेटी बचाओ बेटी पढाओ मध्य नागपूर तर्फे ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती

नागपूर : बेटी बचाओ बेटी पढाओ मध्य नागपुर तर्फे सामाजिक भवन द्वारकामाई हॉटेल जवळ, गणेशपेठ येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शीबिरात  महिलांमध्ये आढ्ळणारे ब्रेस्ट cancerची काळजी घेण्यासाठी व घर, मुल आणि संसार यामधून त्यांना बाहेर काढून स्वत: चे आरोग्यविषयक काळजी आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी  जनजागृती करून महिलांना  तपासणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ मध्य नागपुरच्या नीरजा  पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी महिलांनी प्रत्येक 6 महिन्यात करायलाच हवी आणि थोडी  जरी शंका आली आणि त्याचे निदान झाले  तर  त्यावर उपचार करु शकतो. पण  जर टेस्टच केली नाही तर हा आजार वाढत जातो आणि नंतर आपल्या हातात काहीच उपचार उरत नाहीत.

बेटी बचाओ बेटी पढाओ मध्य नागपुर तर्फे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने  गिरीश व्यास मध्य मंडळचे प्रभारी,  रेखा निमजे महिला मोर्चा अध्यक्ष, बादल राऊत युवा मोर्चा अध्यक्ष, अनिता काशीकर, मनिषा जिचकार, ममता खोटपाल, लीना पेशने, मीना सहारे, मनिषा मोहिते, ज्योत्सना मोतेवार, वैशाली तारेकर, मोना तारेकर, नितू येओले, मंजूषा बेहेरखेडे, ज्योति शिंपी, मेघा शिंदे, संध्या आसोले, दिपाली बगमारे, चित्रा दूमरे,सुमेधा भाके उपस्तिथ होते.


World Tuberculosis (TB) Day 2022: तुम्हीही टीबीशी संबंधित या 4 मिथकांना सत्य मानता का?

Social Media