Ayurveda Beauty Tips: नितळ त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही कितीही क्रिम आणि लोशन लावा, परंतु जी चमक हवी आहे त्यासाठी पूर्वीपासून केले जाणारे घरगुती उपायच कामी येतात. हे उपाय केवळ त्वचेसाठीच अनुकूल नसून आपल्याला परवडणारे देखील असतात. तसेच यासाठी तुम्हाला महागडी उत्पादने खरेदी करण्याची आवश्यकता नाही, तर स्वयंपाकघरातील किंवा बागेतील काही गोष्टींचा वापर केल्यास त्वचेसंबंधितील सर्व समस्या दूर होतील. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदाशी संबंधित अशाच काही टिप्स देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सुंदर आणि डाग नसलेली त्वचा मिळवू शकता.
Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क –
या आयुर्वेदिक सौंदर्य टिप्सच्या सहाय्याने मिळवा सुंदर त्वचा (Get beautiful skin with the help of these Ayurvedic beauty tips)-
- नैसर्गिक गुलाबपाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून करू शकता. दिवसातून दोनवेळा चेहरा स्वच्छ आणि सौम्य फेशवॉशने धुवा आणि त्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा. जर चेहऱ्यावर गडद डाग किंवा मुरूमे असतील तर, कोरफड जेल लावा आणि कोरडी त्वचा असल्यास नारळाच्या तेलाचा वापर करा.
- त्वचेला स्क्रब करण्यासाठी नैसर्गिक केस असणाऱ्या ब्रशचा वापर करा. या ब्रशच्या वापरामुळे त्वचा टाइट राहते.
- मालिश हा आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, मालिश करण्याचे बरेच फायदे आहेत, जसे की रक्त परिसंचरण वाढणे, तणावग्रस्त गाठींपासून मुक्ती मिळणे आणि यामुळे तुम्हाला आराम देखील मिळतो. तम्ही स्वतःची मालिश देखील करू शकता.
- एक आणखी आयुर्वेदिक अभ्यास आहे तो म्हणजे ऑइल पुलिंग. एक चमचा तेल तोंडात घेऊन १०-१५ मिनिटांपर्यंत हलवा. ही प्रक्रिया रिकाम्यापोटी करा. असे मानले जाते की ऑइल पुलिंग केल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्यामुळे त्वचेवर चमक येण्यास मदत होते.
- हवामानानुसार सर्वांच्या त्वचेमध्ये बदल होतात. उन्हाळ्यात जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हिवाळ्यात ती नक्कीच कमी तेलकट असणार. त्यामुळे हवामानानुसारच उत्पादनांचा वापर करा.
- आहाराविषयी बोलायचे झाले तर, आयुर्वेदिक सौंदर्य नियमानुसार दररोज व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन ई सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या आहाराचे सेवन करा. जे त्वचेसाठी खूप महत्वाचे आहेत.
Ayurveda Beauty Tips: 6 Ayurvedic Beauty Tips That Will Protect Your Skin All Year Long!
Beauty Tips :सुंदर त्वचेसाठी मूगडाळीचा करा असा वापर….. –
Beauty Tips : अतिरिक्त केसांची समस्या दूर करण्यासाठी लावा मूगडाळीचा फेसपॅक!
beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे –
Beauty Tips : निरोगी त्वचा आणि केसांसाठी वापरा ‘बीट’चा मास्क…