बदलापूर प्रकरणातील रणरागिणी ला मनसेकडून तिकीट?

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर आतापर्यंत मनसेने एकूण ४७ उमेदवार जाहीर केले आहेत.

 मनसेने काल रात्री उशिरा आगामी विधानसभा निवडणुका लढणाऱ्या उमेदवारांची यादी घोषित केली. या यादीत ४५ जणांचा समावेश असून मनसेकडून आतापर्यंत ४७ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मनसेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दोन महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.मनसेने जाहीर केलेल्या यादीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संगिता चेंदवणकर या मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पण संगिता चेंदवणकर यांच्या पुढाकारामुळे गुन्हा दाखल झाला होता. तसेच बदलापूरकरांनी जनआंदोलनही केले होते. याचे नतेृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते. या घटनेला वाचा फोडणाऱ्या संगिता चेंदवणकर यांचे राज ठाकरे यांनी कौतुक केले होते. तसेच आता संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून महिला उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेकडून गेवराई मतदारसंघातून सौ. मयुरी बाळासाहेब म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात अनेक महत्त्वपूर्ण लढाई पाहायला मिळणार आहेत.

मनसे उमेदवारांची संपूर्ण यादी

कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील माहीम – अमित राज ठाकरे भांडुप पश्चिम – शिरीष गुणवंत सावंत वरळी – संदीप देशपांडे ठाणे शहर – अविनाश जाधव मुरबाड – संगिता चेंदवणकर कोथरुड – किशोर शिंदे हडपसर – साईनाथ बाबर खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे मागाठाणे – नयन प्रदीप कदम बोरीवली- कुणाल माईणकर दहिसर- राजेश येरुणकर दिंडोशी – भास्कर परब वर्सोवा – संदेश देसाई कांदिवली पू- महेश फरकासे गोरेगांव – विरेंद्र जाधव चारकोप – दिनेश साळवी जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे विक्रोळी – विश्वजित ढोलम घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे चेंबूर – माऊली थोरवे चांदिवली – महेंद्र भानुशाली मानखुर्द – शिवाजीनगर – जगदीश खांडेकर ऐरोली – निलेश बाणखेले बेलापूर – गजानन काळे मुंब्रा-कळवा – सुशांत सूर्यराव नालासोपारा – विनोद मोरे भिवंडी पश्चिम- मनोज गुळवी मिरा-भाईंदर – संदीप राणे शहापूर – हरिश्चंद्र खांडवी गुहागर – प्रमोद गांधी कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी आष्टी- कैलास दरेकर गेवराई – मयुरी बाळासाहेब म्हस्के औसा – शिवकुमार नागराळे जळगांव शहर – अनुज पाटील वरोरा – प्रवीण सूर सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे कागल – रोहन निर्मळ सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे तासगांव-कवठे महाकाळ- वैभव कुलकर्णी श्रीगोंदा – संजय शेळके हिंगणा – विजयराम किनकर नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर सोलापूर शहर – उत्तर – परशुराम इंगळे

Social Media