मुंबई : बदलापूर(Badlapur) येथील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले असून, पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही जारी केले आहेत. या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी निर्णयाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती देण्याची विनंती केली होती, जेणेकरून ते सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतील. मात्र, उच्च न्यायालयाने ‘ती स्पष्टपणे फेटाळून लावली.
The Bombay High Court delivered a significant ruling on Monday regarding the alleged encounter case of Akshay Shinde, the accused in the Badlapur school sexual assault incident.