Bank Strike: या महिन्यात सलग चार दिवस बँका बंद, बँक युनियन संपावर

मुंबई : बँक कर्मचारी संघटनांचे संयुक्त व्यासपीठ असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने अनेक मागण्यांसाठी 31 जानेवारीपासून दोन दिवसीय संप (Bank Strike) जाहीर केला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत इंडियन बँक्स असोसिएशनच्या मागण्यांना प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही ३० आणि ३१ जानेवारीला संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे फोरमने  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बँकांमध्ये १५ दिवस काम करणे, पेन्शन अपडेट करणे, सर्व संवर्गातील नियुक्ती यासह अन्य मागण्या कामगार संघटना करत आहेत.

काय आहे मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून कामगार संघटना पाच दिवसीय बँकिंग, पेन्शन अपडेट (Pension Updates)आणि सर्व कॅडरमधील लोकांच्या भरतीसह इतर मुद्द्यांची मागणी करत आहेत. दोन दिवसांच्या बँक संपामुळे देशभरातील बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक ग्राहकांना संप लक्षात घेऊन त्यांच्या बँकिंग कामकाजाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सलग चार दिवस बँका बंद

28 जानेवारीला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने या दिवशी बँका बंद राहणार आहेत आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँक युनियन 30 आणि 31 जानेवारीला संपावर जाण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना सलग 4 दिवस त्रास सहन करावा लागू शकतो.

Social Media