कोरियन-जपानी महिलांसारखी सुंदर त्वचा हवीय? मग हे करा!

कोरिया आणि जपानमधील महिलांच्या सौंदर्याची जगभर चर्चा होत असते.. इथल्या स्त्रिया चमकत्या, सुंदर त्वचेसाठी ओळखल्या जातात. जगभरातील स्त्रिया त्यांची त्वचा कोरिया आणि मजापानच्या स्त्रियांसारखी दिसावी म्हणून प्रयत्न करत असतात.. यासाठी महिला अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. परंतु कोरिया आणि जपानच्या महिला आपल्या त्वचेवर काय लावतात हे कोणालाही माहिती नाही. आज आम्ही हे रहस्य आपल्याबरोबर सामायिक करीत आहोत. या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा नक्कीच चमकदार आणि सुंदर दिसेल…

लिंबू आणि पाणी – कोरियन स्त्रिया त्वचेची स्वच्छता करण्यासाठी लिंबू पाण्याची वाफ घेतात. यामुळे त्वचेवरील खुले छिद्र बंद होतात. असे केल्याने मुरुमांपासून सुटका होते आणि त्वचेचा टोन सुधारते. यासाठी भांड्यात पाणी गरम करून त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला आणि मग चोहऱ्यावर वाफ घ्या…

गरम टॉवेल – कोरियन महिला गरम पाण्यात टॉवेल टाकून त्याने चेहरा स्वच्छ करतात. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावरील कांती परत येते.

चेहऱ्याचा व्यायाम – चेहऱ्याच्या व्यायामामुळे त्वचा टाईट होण्यास मदत होते आणि  यामुळे सुरकुत्याही येत नाहीत.

मॉइश्चरायझर– कोरियन महिला थेट चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी हातावर मॉइश्चरायझर पसरवतात आणि मग ते चेहऱ्यावर लावतात. असे केल्याने हातांची उष्णता मॉइश्चरायझरमध्ये मिळते आणि त्वचा सहज शोषून घेते.

Tag-beautiful skin like Korean-Japanese women? Then do it!

 

 

 

 

 

Social Media