Beauty Tips : या घरगुती उपायांनी दूर करा नाकावरील काळपटपणा… 

 उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा जागोजागी काळे होण्यास सुरवात होते. या काळ्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी आपण  विविध उपायांचा वापर करतो. अशीच एक समस्या म्हणजे नाकाजवळच्या त्वचेवर काळसरपणा चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. आम्ही असे घरगुती उपचार सांगत आहोत ज्याद्वारे आपण या समस्येपासून त्वचेला  मुक्त करू शकता.

लिंबाचा रस(Lemon Juice)

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतो. ज्यामुळे नाकाजवळील काळेपणा दूर करण्यास  मदत होते. ज्या भागावर काळपटपणा असेल त्या ठिकाणी  लिंबाचा रस थोडा वेळ लावून मसाज करा… ड्राय झाल्यानंत  थंड पाण्याने चेहरा धुवा.

कोरफड जेल (Aloe Vera Gel )

कोरफड  जेल त्वचेवरील काळे डाग  दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाकाच्या कोपऱ्यातून काळे डाग दूर करण्यासाठी  त्याठिकाणी शुद्ध कोरफड जेल लावणे फायदेशीर ठरेल. काळ्या भागामध्ये थोडा वेळ लावा आणि थोडावेळ तसेच  राहू द्या. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा.

अंडी (eggs)

अंड घ्या आणि अंड्याचा पांढरा भाग आपल्या नाकावर लावा. कोरडे झाल्यावर ते चोळा आणि मग धुवा. हे नाक आणि नाकासभोवतालची काळेपणा काढून टाकण्यास उपयुक्त आहे.

टोमॅटो(Tomato)

टोमॅटोचा उपयोग काळ्या डागांना दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यासाठी टोमॅटोचा पेस्ट चेहऱ्यावर  सुमारे 15 मिनिटे नाकाची मालिश करा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

दही(curd )

लॅक्टिक ऍसिड दहीमध्ये आढळतो. त्याचा परिणाम त्वचेसाठी ब्लीच करण्यासारखा आहे. आपल्याला फक्त दही चेहऱ्यावर लावावे आणि नंतर ते कोमट पाण्याने धुवावे.

संत्री(orange)

दोन चमचे संत्र्याचा लगदा घेऊन त्यात थोडी हळद घाला. याची बारीक पेस्ट बनवून रात्री झोपण्यापूर्वी नाकावर चोळा  आणि सकाळी उठून पाण्याने धुवा.

मध(honey)

नाकावर आणि नाकाच्या आजुबाजूला असणारी कोरडी त्वचा काळेपणा वाढवण्यास  मुख्य कारण आहे. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी वापरली जाते. नाकावर  थोडं मध लावून ते वाळू द्या ते कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

Lemon contains a lot of vitamin C. Which helps in removing blackness near the nose. Massage lemon juice for a while in areas where there is blackness… Wash your face with cold water when dry.

Social Media