Beauty Tips : मजबूत केस आणि निरोगी त्वचेसाठी असा करा आवळ्याचा वापर….

Beauty Benefits of Amla : नैसर्गिकरित्या त्वचा आणि केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर केला जाऊ शकतो. तथापि अनेक लोकांना माहित आहे की आवळ्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु सौंदर्य उपचारातील याच्या वापराबद्दल लोकांना खूपच कमी माहिती असते. आवळा आपल्या त्वचेला टाइट करण्यासाठी आणि टोन सुधारण्यासाठी मदत करतो. यामुळे केस चमकदार आणि कोंडामुक्त होतात.. जाणून घेऊयात आवळ्याचे त्वचा आणि केसांसाठीचे फायदे…..

 मुरुमांचे डाग नष्ट करते(removes acne marks)-

Beauty-Tips

आवळा नैसर्गिकरित्या मुरूमांच्या खुणा आणि डाग-धब्बे दूर करण्यास मदत करतो. आवळ्याचा रस चेहऱ्यावर लावा आणि ३० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. जर त्वचा संवेदनशील असल्यास आवळ्याच्या रसात पाणी मिसळून पातळ करा. यामुळे डाग-धब्बे दूर होण्यास मदत होईल.

 मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करते (Helps get rid of dead skin)-

Beauty-Tips

आवळ्याच्या रसाचा वापर फेस स्क्रब म्हणून केला जातो कारण हा त्वचेला चांगल्य़ाप्रकारे एक्सफोलिएट करण्यास मदत करतो. आवळातील एँटीऑक्सीडंट आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन सुधारण्यास आणि त्वचेला घट्ट तसेच निरोगी बनविण्यास मदत करतात. एक चमचा आवळ्याची पावडर घ्या आणि त्यामध्ये गरम पाणी मिसळा. त्यानंतर चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी या पेस्टचा वापर करा आणि ५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. पेस्टमध्ये थोडीशी हळद मिसळू शकता.

 केस गळती नियंत्रित करते (controls hair loss)-

controls-hair-loss

केस गळती नियंत्रित करण्यासाठी आवळा अत्यंत प्रभावी आहे. वाळलेला आवळा घ्या आणि तो पाण्यात उकळा. त्यानंतर याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना आणि केसांना लावू शकता. असे आठवड्यातून दोनदा करू शकता, त्यामुळे केस गळती नियंत्रित होते. तुम्ही केसांसाठी आवळ्याच्या रसाचा वापर देखील करू शकता आणि अर्ध्या तांसानी केस धुवा. पातळ आणि कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमितपणे केस धुण्यापूर्वी आवळा हेअर ऑईलचा वापर करा. आवळा तेल एक उत्तम कंडीशनर आहे आणि केसांना एक नैसर्गिक चमक देते.
Use Amla in these ways for strong hair and healthy skin.


Beauty Tips : त्वचेला चमकदार बनवते देसी तूप, जाणून घ्या अनेक फायदे…. –

Beauty Tips : जाणून घ्या देसी तूपाचे सौंदर्यासाठीचे फायदे…

ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी फेसपॅक –

Beauty Tips : मुरूमे आणि ब्लॅकहेड्सच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी आंब्याचा फेसपॅक उपयुक्त!

Social Media