Beauty Tips : कारले आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर!

Karela Beauty Tips : कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याच्या कडवट चवीमुळे तो आरोग्यासाठी खूप चांगला असल्याचे सिद्ध होते. परंतु तुम्हाला माहित आहे का की कारलं (Bitter melon) केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्याच्या वापराने त्वचा देखील खूप चांगली होते. कारल्याचा वापर केल्याने सुरकुत्या, मुरूमे आणि डाग-धब्बे यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. तर मग जाणून घेऊयात कारल्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा…..

 डाग-धब्बे आणि मुरूमांची समस्या दूर करण्यासाठी (To remove blemishes and acne)-

for-wrinkles

एक कारलं आणि कडुलिंबाची दहा पाने घेऊन त्याची बारीक पेस्ट करा. त्यानंतर या पेस्टमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. हा फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहरा आणि मानेला लावा आणि २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

चमकदार त्वचेसाठी (For glowing skin)-

To-remove-blemishes-and-acne

एक कारले आणि संत्र्याची साल घ्या. त्यांची एकत्र जाडसर पेस्ट करा. त्यामध्ये एक चमचा मुल्तानी माती मिसळा सोबतच अर्धा चमचा बेसन देखील मिसळा. हे सर्व एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १० मिनिटांपर्यंत मसाज करा १५ मिनिटे ठेवून चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी (for wrinkles)-

for-wrinkles

एक मोठा चमचा कारल्याचे रस घ्या. त्यानंतर दोन मोठे चमचे दह्यासोबत चांगल्याप्रकारे हे मिसळा. सोबतच एक अंड्याचा पांढरा भाग काढून त्याचा अर्धा भाग या मिश्रणात मिसळ. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे सुरकुत्यांची समस्या दूर होईल.
Bitter melon is very beneficial for the skin as well as health, use it on the face like this.


नैसर्गिकरित्या त्वचा आणि केसांची समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा वापर –

Beauty Tips : मजबूत केस आणि निरोगी त्वचेसाठी असा करा आवळ्याचा वापर….

Social Media