Beauty Tips : निखळ त्वचेसाठी करा आंबट फळांचे सेवन…

मुंबई : प्रत्येकाला सुंदर ताजे आणि तंदुरूस्त दिसावे असे वाटते परंतू जरूरी नाही की यासाठी तुम्ही पार्लर आणि बाहेरील सौंदर्य प्रसाधनांवरच अवलंबून राहिले पाहिजे. जर तुम्ही आपल्या आहारात चविला आंबट असणाऱ्या फळांचा समावेश केलात तर तुम्हाला सुंदर आणि चमकते दिसण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या आहारात थोडासा बदल केलात तर तुमचे सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्यासोबत राहिल. आंबट फळांना सौंदर्यांचे स्त्रोत मानले जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही बाजारात भाजी आणण्यासाठी जाल, तेव्हा सौंदर्य वाढवणारी आंबट फळे आणायला विसरू नका.

चेहऱ्यावर चमक हवी आहे, तर करा आंबट फळांचे सेवन

If you want a glow on your face, consume sour fruits

  •  संत्री (Eat oranges):
    संत्र्यामध्ये सर्वाधिक फायबर असते. आहारतज्ञांच्या मते साधारण आकाराच्या संत्र्यामध्ये ३ ग्रॅम फायबर असते. हे खाल्याने दिर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. याद्वारे वजन देखील नियंत्रित केले जाते.

आंबट-फळांचे-सेवन

 

  •  लिंबू (Eat lemon):
    लिंबाच्या गुणधर्मांवर पुस्तके लिहिणे देखील कमीच आहे. हे छोटेसे आंबट फळ आंतड्यांची स्वच्छता करते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणते.

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी करा ‘या’ फळांचे सेवन..

Consume ‘these’ fruits to bring shine to the face.

निखळ-त्वचेसाठी

  • आंबट फळे (Eat citrus fruits) :
    आंबट फळे जसे की संत्री, द्राक्ष तसेच हंगामी फळांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ मुबलक प्रमाणात असते. सामान्यतः एका मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये ७० मिलिग्रॅम व्हिटॅमिन ‘सी’ असते. दिवसभरामध्ये आपल्या शरीरासाठी एवढ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी पुरेसे असते.

Citrus fruits such as oranges, LEMON grapefruit, have abundant vitamin C. medium-sized orange usually contains 70 mg of vitamin C. The same amount of vitamin C is sufficient for our body throughout the day.

Social Media