Beauty Tips : चेहऱ्याची रंगत वाढविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

नवी दिल्ली, Beauty Tips: खराब जीवनशैली, आणि खाण्या-पिण्यावर योग्यरित्या लक्ष न दिल्यामुळे चेहऱ्याची त्वचा (Face Skin) निर्जीव होते. व्यस्त जीवनशैली, धूळ, आणि प्रदूषणामुळे चेहरा निर्जीव आणि कोरडा दिसतो, चेहऱ्याची रंगत कमी होते यापासून मूक्ती मिळविण्यासाठी अनेक लोक बाजारातील बऱ्याच प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात, परंतु यापासून नैसर्गिक चमक (Natural Face Glow) मिळविणे कठीणच नाही तर अशक्य आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घरगुती उपाय(Home Remedies) ज्याद्वारे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवू शकता.

Beauty Tips : नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!

Beauty Tips: ‘This’ home remedy is beneficial for getting natural shine!

चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी तुम्ही दूध, काकडी, गुलाबपाणी इत्यादींचा वापर नक्कीच केला असणार. आज आम्ही तुमच्यासाठी यासबंधितच काही वेगळ्या पद्धती घेऊन आलो आहोत, जे उन्हाळ्यात आपल्या त्वचेच्या आवश्यकतेनुसार चमक आणण्यास मदत करतील. जेणेकरून आपली त्वचा चांदीसारखी चमकदार आणि सुंदर दिसू लागेल.

दूध-लिंबूचा वापर (Milk and lemon face will glow)-

Beauty-Tips

त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही दूध आणि लिंबू एकत्र करून त्याचा वापर करू शकता. दूध आणि लिंबाचे विपरित गुणधर्म असले तरी थंड दूधामध्ये लिंबाचा रस मिसळून तो चेहऱ्यावर लावल्यास तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. अर्ध्या कप दूधात एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा, हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर पुन्हा लावा. त्यानंतर चेहरा ओल्या कापडाने स्वच्छ पुसा. नियमितरित्या हे लावल्याने त्वचेवर चमक येईल.

झोपण्यापूर्वी चेहऱ्याची स्वच्छता (Facial cleansing before bed is necessary)-

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ दूर होईल. तसेच झोपण्यापूर्वी तुम्ही त्वचेला आठवड्यातून दोनवेळा मॉलिश करा. मॉलिश करण्यासाठी १ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि १ चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
You can use milk and lemon mixed together to remove the blackness of the skin. And massage, apply 1 teaspoon of olive oil and 1 teaspoon of honey on the face.


Beauty Tips : नियमित बटाट्याचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यांचा रंग होतो उजळ… – 

Beauty Tips : त्वचेतील वृद्धत्वाची समस्या रोखण्यासाठी रेड वाईन उपयुक्त

Beauty Tips : त्वचेला तरूण आणि उजळ ठेवण्यासाठी रेड वाइन फायदेशीर!

Social Media