Beauty Tips :ओठांवर पडलेले लिपस्टिकचे डाग दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

Beauty Secrets : मुलींमध्ये लिपस्टिक(Lipstick) लावण्याची एक वेगळीच क्रेझ असते. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणखी खुलून येते. तर, आजकाल लिक्विड आणि मॅट लिपस्टिकचा कल आहे. उन्हाळ्यात या लिपस्टिक्स लावल्यास ओठांची सुंदरता वाढण्यासह आरामदायक वाटते. परंतु बऱ्याचदा या लिपस्टिकचे डाग ओठांवर पडतात आणि त्यांना हटविणे थोडे कठीण काम असते. सोबतच यामुळे ओठ काळे आणि कोरडे पडू लागतात. जाणून घेऊयात काही घरगुती वस्तूंचा वापर करून या समस्या कशा दूर केल्या जाऊ शकतात.

 

तेलाचा वापर (best option for oiling)-

Beauty-Secrets

चेहऱ्यावर मेकअप प्रमाणे ओठांवर पडलेले लिक्विड लिपस्टिकचे डाग हटविण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. यामुळे ओठांवर पडलेले हट्टी डाग स्वच्छ होतील आणि मऊपणा येईल. असे केल्यास ओठ साफ, मुलायम आणि गुलाबी दिसू लागतील. यासाठी नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑईल इत्यादी तेल एका कापसाला लावून ओठांचा मसाज करा. त्यानंतर काही सेकंदापर्यंत ते तसेच ठेवून द्या. थोड्यावेळाने स्वच्छ करा.

Beauty Tips : जाणून घ्या कारल्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा…..

कोमट पाण्याचा वापर (use lukewarm water)-

ओठांवर पडलेले लिक्विड लिपस्टिकचे डाग घालविण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता. यासाठी पाण्यात कॉटन बॉल बुडवून ओठांवर हळूवारपणे घासा. त्यानंतर काही काळ ते ओठांवर तसेच ठेवा आणि नंतर स्वच्छ करून लिपबाम किंवा पेट्रोलियम जेली लावा.

कोल्ड क्रीम वापरा (applying cold cream)-

Beauty-Secrets

तुम्ही ओठांवर कोल्ड क्रीम लावून देखील या समस्येतून मुक्ती मिळवू शकता. यासाठी ओठांवर थोडीशी कोल्ड क्रीम लावून मसाज करा. त्यानंतर थोडा वेळा तसेच ठेवून कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. वास्तविक, क्रीम तेलयुक्त असते. त्यामुळे सहजरित्या लिक्विड लिपस्टिकचे डाग स्वच्छ करणे शक्य होते. आणि ओठांवर पडलेल्या खुणा दूर होऊन ओठ मऊ होतात.
Try these tips to remove lipstick stains from lips.


Beauty tips : गर्भधारणेदरम्यान त्वचेला कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय –

Beauty tips : गर्भधारणेदरम्यान अशी घ्या सौंदर्याची काळजी….

Social Media