Beauty Tips : वाढत्या वयात त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी ग्लायकोलिक ऍसिड फायदेशीर!

Beauty Tips: वय वाढण्यासोबतच आपल्या त्वचेची चमक देखील कमी होण्यास सुरूवात होते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसण्यास सुरूवात होते आणि त्वचा निर्जीव असल्याचे दिसून येते. तसंच बाजारात अशी अनेक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे वय लपविण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु तुम्हाला माहित आहे का या उत्पादनांमध्ये असे काय असते, ज्यामुळे तुमची त्वच्या इतकी तरूण दिसू लागते.

Beauty-Tips

बहूतांश सौंदर्य प्रसाधनांमध्ये जसे की फेसवॉश(Facewash), टोनर (toner)आणि क्रिम मध्ये ग्लायकोलिक ऍसिड(glycolic acid) हा महत्वाचा घटक असतो. त्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. तसेच त्वचा टोनिंग होते आणि ग्लायकोलिक ऍसिडमुळे सुरकुत्या, पिंगमेंटेशन ची समस्या देखील कमी होते. याच्या वापरामुळे त्वचा मऊ आणि सुंदर बनते. तर मग जाणून घेऊयात ग्लायकोलिक ऍसिडचे फायदे..

ग्लायकोलिक ऍसिडद्वारे घ्या त्वचेची काळजी (Take care of skin with glycolic acid?) :

ग्लायकोलिक ऍसिड त्वचेमध्ये कोलेजन नावाचा एक प्रोटीन तयार करतो. याद्वारे आपली त्वचा तरूण दिसते. कोलेजनमुळे आपली त्वचा लवचिक आणि मजबूत बनते. कोलेजनचा वापर एँटी एजिंग(Anti Aging) म्हणून देखील केला जातो. तसंच वाढत्या वयामुळे आणि सूर्यप्रकाशामध्ये कोलेजन कमी होण्यास सुरूवात होते. परंतु ग्लायकोलिक ऍसिडद्वारे तुम्ही कोलेजन कमी होण्याच्या प्रक्रियेला रोखू शकता. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमक येते.

ग्लायकोलिक ऍसिडचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी

Use of glycolic acid to take care of skin

त्वचेची दुरूस्ती (Skin Repair) : बहूतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये भरपूर प्रमाणात ग्लायकोलिक ऍसिड चा वापर केला जातो. हा एक कार्बनिक म्हणजेच पाण्यामध्ये विरघळणारा कार्बन रेणू आहे. याला अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड म्हणजेच एएचए असेही म्हटले जाते. अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड मध्ये लॅक्टीक ऍसिड, मॅलिक ऍसिड, टार्टरिक ऍसिड आणि सायट्रीक ऍसिड असते. सौंदर्य उत्पादनांमध्ये १० टक्के ग्लायकोलिक ऍसिडचा वापर केला जातो. याचा त्वचेची काळजी घेण्यासाठी वापर केला जातो.

स्किन व्हाईटनिंग (Skin whitening) :

त्वचेला चमकदार आणि त्वचेवरील बारीक रेषा मिटविण्यासाठी प्रसाधनांमध्ये ग्लायकोलिक ऍसिडचा वापर केला जातो. यामुळे त्वचा तरुण आणि टवटवित बनते. परंतु ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी ग्लायकोलिक ऍसिड असणाऱ्या प्रसाधनांचा वापर कमी करावा.

Glycolic acid reduces wrinkles, pigmentation problems. Using it, the skin becomes soft and flexible.

सुंदर त्वचेसाठी या ब्यूटी टिप्स फायदेशीर! – 

Beauty Tips : त्वचेच्या सौंदर्यासाठी करा ‘हे’ उपाय! 

Social Media