Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी जाणून घ्या केळीच्या सालीचे फायदे…

मुंबई: ‘केळ’ एक सुपर फूड आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन, मीनरल्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तुम्हाला सर्वांना माहित आहे केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का केळ्याची साल आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केळ्याची साल तुम्ही लावू शकता.

केळ्याची साल त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर!

Banana peel beneficial for solving skin problems!

जर तुम्हाला मुरूमांची समस्या असेल तर केळ्याच्या सालींचा वापर करा. यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. जे मुरूम दूर करण्यास मदत करते. याशिवाय चेहऱ्यावरील डागांची समस्या देखील दूर होते. चला तर मग जाणून घेऊयात केळ्याच्या सालीचा वापर कशाप्रकारे केला जाऊ शकतो.

तेलकट-त्वचेसाठी

केळ्याच्या सालीचा स्क्रब (Banana Peel Scrub)

त्वचेसाठी केळ्याची साल खूप फायदेशीर आहे. त्वचेची समस्या दूर करण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी ३ चमचे साखर, ओटमीलची पावडर, केळ्याच्या सालीची पावडर घ्या. त्यानंतर हे एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावा आणि चेहरा कोरडा झाल्यानंतर स्वच्छ धुवा. केळ्याच्या सालीमध्ये मध आणि हळद बोटांच्या मदतीने चांगले मिसळा. हे मिश्रण केळ्यासोबत चेहऱ्यावर घासा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे ते चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर ओल्या कापडाने चेहरा पुसा.

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून मुक्ती (Relieves dark circles)

Banana-Peel-Scrub

जर तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग असतील तर केळ्याच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी केळ्याच्या सालीमध्ये कोरफड मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखालील डागांवर लावा आणि १० मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. हे आठवड्यातून तीनवेळा करू शकता.

तरूण त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय! – 

तेलकट त्वचेसाठी (For oily skin)

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर केळ्याच्या सालीमध्ये लिंबू आणि एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्याने चांगले परिणाम दिसून येतील.
Banana peel is very beneficial for health as well as skin. Banana peel contains plenty of vitamins B, C, E, potassium and magnesium.


कच्चा दूधाच्या वापराने डाग-सुरकुत्या यांसारख्या समस्या होतात दूर…

Beauty Tips : कच्चे दूध सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर!

Social Media