Beauty Tips : चेहऱ्यावरची चमक कायम ठेवण्यासाठी ‘असा’ बनवा साबुदाणा फेसपॅक!

Skincare Tips : गरमीचे हवामान आपल्या केस आणि त्वचेसाठी खूप कठिण काळ असतो. घामाच्या चिकटपणामुळे केस तुटण्याची समस्या निर्माण होते आणि केस कमकुवत होऊ लागतात. तसेच चेहऱ्यावर मुरूमांची समस्या उद्भावते. याशिवाय गरमीमुळे चेहऱ्याचा रंग बदलतो. परंतु आता यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याच घरात या समस्येवर तोडगा आहे. बहूतांश घरात साबुदाणा(sago) उपलब्ध असतो. साबुदाणा खाणे खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. परंतु आज आम्ही साबुदाणा लावण्याचे फायदे काय आहेत याविषयी सांगणार आहोत. साबुदाणा फेसपॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे.

साबुदाण्यात (sago) व्हिटॅमिन बी६, स्टार्च, आयर्न, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम, सोडियम इत्यादी पोषक घटक आढळतात. हे सर्व घटक त्वचेला चमकदार बनवतात. साबुदाण्यात स्टार्च आढळतो, जो चेहऱ्याला चमकदार बनविण्यासह त्वचेला टाइट (घट्ट) बनवितो.

Skincare-Tips

तुम्हाला जर त्वचेला अधिक मऊ बनवायचे असेल, तर साबुदाण्याच्या फेसपॅकचा वापर करा, कारण यामधील सर्व घटक चेहऱ्यावरील डाग-धब्बे दूर करण्यास मदत करतात आणि त्वचेला मुलायम बनवितात. साबुदाण्यात एँटी ऑक्सीडंट भरपूर प्रमाणात आढळते, जे चेहऱ्यावरील मुक्त कणांना (free radicals) तटस्थ करते आणि त्वचेवरील डाग नष्ट करण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमे देखील प्रतिबंधित होतात.

साबुदाण्याचा फेसपॅक बनविण्यासाठी एक चमचा साबुदाण्यात दोन चमचे लिंबाचा रस, दोन चमचे गुलाबपाणी, एक चमचा ब्राऊन शुगर आणि एक चमचा मुल्तानी माती घ्या. त्यानंतर एका भांड्यात साबुदाणा आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर हे मिश्रण गरम करा, जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा त्याची पेस्ट बनवा आणि या फेसपॅक मध्ये लिंबू, मुल्तानी माती आणि ब्राऊन शुगर चांगल्याप्रकारे मिसळा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा कोरडी असल्यास फेसपॅक बनविताना लिंबाचा वापर करू नका.

Skincare-Tips

फेसपॅकचे फायदे (benefits of face pack)-

१. त्वचा मुलायम आणि कोमल राहते.
२. मुरूमांच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
३. चेहऱ्यावरील डाग-धब्यांच्या खुणा निघून जातात.
Skincare Tips: Make sago face pack at home like this, the glow of the face will remain.


Beauty Tips : कडुनिंबामधील लपलेल्या गुणधर्मांचा फायदा घेण्यासाठी याबाबत जाणून घेणे आवश्यक –

Beauty Tips : आरोग्य, सौंदर्य आणि केसांची काळजी घेण्यासाठी असा करा कडूनिंबाचा वापर…..

Beauty Tips : खुल्या छिद्रांपासून मुक्ती मिळविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय! –

Beauty Tips : ‘या’ घरगुती उपायांमुळे चेहऱ्यावरील खुली छिद्रे होतात बंद!

Beauty Tips : आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याचे तेल फायदेशीर! –

Beauty Tips : जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे फायदे……

Social Media